शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे थांबे वाढविण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:46 IST

लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची ...

ठळक मुद्देबैठक : मध्य रेल्वेच्या विविध समस्यांबाबत महाव्यवस्थापकांशी चर्चा

लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन फक्त कोविड स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या. त्यात त्यांच्या कोविडच्या चाचण्या करून फिजिकल डिस्टन्स ठेवूनच त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे ठरावीक ठिकाणीच कोविड स्पेशल रेल्वेचा थांबा असल्याने, अनेक रेल्वे स्थानकांवर त्या थांबत नसल्याने, प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ.भारती पवार यांनी रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचेशी नासिक रोड येथील स्थानकात बैठकीदरम्यान चर्चा केली.या चर्चेदरम्यान नांदगाव येथे प्रवाशांची व पासधारक प्रवासी व यात्रेकरू यांची वाढती संख्या लक्षात घेता, या प्रवाशांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या किमान दोन ते तीन रेल्वेचा थांबा देण्यात यावा, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येईल, तसेच मनमाड, नासिक ते मुंबई येथे प्रवास करणारे अनेक चाकरमानी नोकरीच्या निमित्ताने आपल्या कार्यालयात रोज जाऊन येऊन नोकरी करतात. त्यांना वेळेवर दुसरी प्रवासाची साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण लक्षात घेता, त्यांच्यासाठी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी वेळेवर पोहोचता येईल, तसेच मनमाड रेल्वे स्टेशन हे रेल्वे जंक्शन आहे आणि धुळे, नगर जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना तथा चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव या आसपासच्या परिसरातील जनतेलाही देशभरात अनेक ठिकाणी जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावरून सुविधा उपलब्ध आहे, परंतु रेल्वेसेवा बंद असल्याने, त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत, त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. अशा विविध मागण्या या बैठकीप्रसंगी खा.डॉ.भारती पवार यांनी मांडल्या. या बैठकीप्रसंगी विवेक गुप्ता, युवराज पाटील यांच्यासह अनेक रेल्वे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मनमाड स्थानकातील कामे संथगतीनेमनमाड मोठे रेल्वे जंक्शन असून, तेथे मोठा गुरुद्वारा असल्याने त्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, देशभरातून अनेक भाविक या गुरुद्वारास भेट देण्यासाठी येत असतात. मनमाड शहराचाही विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. मनमाडची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथील रेल्वे रुग्णव्यवस्था अधिक चांगली व्हावी, अधिकच्या रुग्णसुविधा रुग्णांना मिळाव्या व रेल्वे स्थानकाचेही आधुनिकीकरण व्हावे, यासाठी लवकरात लवकर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या मनमाड रेल्वे स्थानकात जी विकासकामे चालू आहेत, ती अतिशय संथ गतीने चालू आहेत, त्याही कामास गती मिळावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcentral railwayमध्य रेल्वे