शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थानं

By admin | Updated: June 10, 2017 00:43 IST

त्र्यंबकेश्वर : पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी आज, शुक्रवारी (दि. ९) मोठ्या उत्साहात रवाना झाली.

 लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी आज, शुक्रवारी (दि. ९) मोठ्या उत्साहात रवाना झाली. तत्पूर्वी कीर्तनादी सोहळा संपन्न झाले. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा हा अभंग झाला आणि चांदीच्या रथात महाराजांच्या पादुका विराजमान होत दिमाखदार पालखी रथ सोहळ्याला प्रारंभ झाला.देवस्थानचे मानकरी जयंत महाराज गोसावी, सुरेश महाराज गोसावी, मनोहर (मनू) महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, निवृत्ती महाराज डावरे, देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंडगे, पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे, दिंडी व्यवस्थापक पुंडलिकराव थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, पवन भुतडा, रामभाऊ मुळाणे, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे, डॉ. धनश्री हरदास, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदींसह महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, महामंडलेश्वर रघुनाथदास महाराज जाधव (ओझरखेडकर) आदींसह देवस्थान व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाणे, विष्णू बदादे व दादा आचारी आदी उपस्थित होते.निवृत्तिनाथ मंदिरापासून रथ श्रीकुशावर्त तीर्थापर्यत आला. यावेळी कुशावर्त तीर्थावर नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांच्या हस्ते निवृत्तिनाथांच्या पादुकांची पूजा करण्यात येऊन पूजास्थानापासून ते पालखीपर्यंत पादुका डोक्यावर आणण्यात आल्या. कुशावर्तावरून पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातील भंगा, हा अभंग झाल्यावर पालखीने प्रस्थान केले. पालखी दिमाखात पुढे निघाल्यानंतर महामृत्युंजय भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत पालखी आली आणि निवृत्तिनाथांना त्र्यंबकेश्वराचे दर्शन घडवून तुम्ही विश्वनाथ दीन रंजक मी अनाथ कृपा कराल थोडी... हा अभंग होऊन पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. रथाला येथील माजी नगराध्यक्ष सुनील महाराज अडसरे यांच्या खिल्लारी बैलांना मान मिळाला होता, तर त्र्यंबकच्या वेशीपासून ते नाशिकपर्यंत ब्राह्मणवाडे (त्र्यंबक) येथील गोऱ्हे परिवाराचे बैल आलटून-पालटून पंढरपूरपर्यंत जाणार आहेत.