शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गाव येथील भरावा पुलाला ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:20 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावापासून ५०० मीटर अंतरावर होत असलेल्या भरावा पुलाला शिंदे ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. भराव पुलामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भराव ऐवजी उड्डाणपूल अथवा सरळ रस्ता ठेवावा, अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावापासून ५०० मीटर अंतरावर होत असलेल्या भरावा पुलाला शिंदे ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. भराव पुलामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भराव ऐवजी उड्डाणपूल अथवा सरळ रस्ता ठेवावा, अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून, या मार्गावर श्ािंदेपासून जवळच भरावा पूल तयार केला जात आहे. या पुलामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी पुलास विरोध दर्शविला आहे. सकाळी ८ वाजता सरपंच माधुरी तुंगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थ एकत्र आले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलानास सुरुवात करण्यात आली.या पुलामुळे दररोज नाशिकरोडच्या बाजारपेठेत जाणारे शेतकरी, कामगार, तसेच शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, कामगार वर्ग यांना या पुलामुळे त्रास होणार आहे. भराव्यामुळे गाव दुभंगले जाणार आहे. शिवाय सुरक्षिततेचादेखील प्रश्न निर्माण होणार आहे. याचा विचार करून भरावा पुलाचे काम बंद करावे, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी ग्रामस्थांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.ग्रामस्थांचा आक्षेपया मार्गावर शिंदे ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, माध्यमिक विद्यालय, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी तसेच मंडल कार्यालय आहेत. या ठिकाणी रोजच नागरिकांची वर्दळ असते. नागरिकांना कामानिमित्त सतत ये-जा करावी लागते. या भरावा पुलामुळे सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.