शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार पगारेचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: November 5, 2016 02:08 IST

सराईत गुन्हेगार पगारेचा जामीन अर्ज फेटाळला

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलगी अत्याचार घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात उसळलेल्या दंगलीतील संशयित व सराईत गुन्हेगार तथा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ‍े) चा शहराध्यक्ष अर्जुन पगारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांनी शुक्रवारी (दि़४) फेटाळला़, तर याच प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेला भाजपा नगरसेवक पवन पवारच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि़९) सुनावणी होणार आहे़तळेगाव येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोळा वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना ८ आॅक्टोबर २०१६ रोजी घडली होती़ या घटनेनंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या तालुक्यांमध्ये दंगल होऊन वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या़ या घटनेचा फायदा घेऊन काही समाजकंटक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते़ ११ आॅक्टोबर २०१६ अर्थात दसऱ्याच्या दिवशी सराईत गुन्हेगार व रिपाइं शहराध्यक्ष अर्जुन पगारे व शांताराम बागुल हे १०० ते १५० दुचाकींवर २०० ते २५० कार्यकर्ते घेऊन एका समाजाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी गज, पाइप घेऊन तळेगावला रॅली घेऊन गेले होते़ तुपादेवी फाट्यावर पगारे व एका समाजाने एकमेकांवर दगडफेक केल्याने दंगल झाली होती़ या प्रकरणी पगारेविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण, सरकारी कामात अडथळा तसेच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़तळेगाव घटनेपासून फरार असलेल्या पगारे याने न्यायाधीश भोस यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ या अर्जावर शुक्रवारी झालेल्या युक्तिवादात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर व पोलीस निरीक्षक तथा या गुन्ह्याचे तपासी अंमलदार मुकुंद देशमुख यांनी जोरदार युक्तिवाद केला़ यानंतर न्यायाधीश भोस यांनी अर्जुन पगारेचा जामीन अर्ज फेटाळला़ दरम्यान, याच दिवशी नाशिकरोड परिसरात पोलीस संचलनानंतर जेलरोड परिसरात दगडफेकीची घटना घडली होती़ पोलीस अधिकाऱ्यांवर चाकूहल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा भाजपाने प्रवेश देऊन पावन करून घेतलेला अपक्ष नगरसेवक तथा सराईत गुन्हेगार पवन पवार यास अटक केली होती़ यानंतर त्याच्या घराच्या झडतीत दोन कट्टे, काडतुसे तसेच हत्यारे सापडली होती़ त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़ (प्रतिनिधी)