शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर भगवा

By admin | Updated: March 22, 2017 02:07 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-माकपा आघाडी कायम राहत अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची, तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसच्या नयना गावित यांची निवड झाली.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेना-काँग्रेस-माकपा आघाडी कायम राहत अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांची, तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसच्या नयना रमेश गावित यांची ३७ विरुद्ध ३५ अशा दोन मतांनी निवड झाली. या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला सोबत घेत सेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु माकपाने सेनेला साथ दिल्याने त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही.  समविचारी नसलेल्या पक्षांच्या युतीने नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक यंदा गाजली. या निवडणुकीत शिवसेनेने पारंपरिक मित्र भाजपाला सोबत न घेता काँग्रेस आणि माकपाला बरोबर घेतले, तर भाजपाने राष्ट्रवादीशी युती केली. नेत्यांच्या वारसांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झालेली ही निवडणूक अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत शिवसेनेकडून शीतल उदय सांगळे यांनी, तर राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नयना गावित यांनी, तर भाजपाकडून  डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सांगळे यांना सूचक म्हणून बाळासाहेब क्षीरसागर व दीपक शिरसाट यांनी स्वाक्षरी केली. तर मंदाकिनी बनकर यांना जयश्री पवार व हिरामण खोसकर सूचक राहिले. उपाध्यक्ष पदासाठी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांना समाधान हिरे व यतिन कदम सूचक होते. नयना गावित यांना यशवंत गवळी सूचक होते. अर्ज छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक घेण्यात आली.  सर्वप्रथम अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शीतल सांगळे आणि राष्ट्रवादी-भाजपा आघाडीच्या मंदाकिनी बनकर यांच्यात लढत झाली. यात सांगळे यांना ३७, तर मंदाकिनी यांना ३५ मते मिळाली. अवघ्या दोन मतांनी बनकर यांचा पराभव झाला.मंदाकिनी बनकर या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी आहेत. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत या मतांची पुनरावृत्ती झाली. कॉँग्रेसच्या नयना गावित यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ जागा आहेत. त्यापैकी सेना-कॉँग्रेस व माकपाच्या एकूण तीन सदस्यांमुळे ३८ मते होती. परंतु माकपाचे गटनेता तटस्थ राहिल्याने विजेत्यांना एक मत कमी मिळाले. शीतल सांगळे या शिवसेनेचे नेते उदय सांगळे यांच्या पत्नी असून सांगळे हे मुळात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे; तर नयना गावित या प्रथमच निवडून आल्या आहेत. त्या कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या नात तर इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदारसंघातील आमदार निर्मला गावित यांच्या कन्या आहेत. (प्रतिनिधी) चिठ्ठीचा कौल गावितांनाकॉँग्रेसमध्ये उपाध्यक्षपदावरून काहीसे संघर्षाचे वातावरण होते. माजी आमदार अनिलकुमार अहेर यांच्या कन्या अश्विनी अहेर, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर तसेच आमदार निर्मला गावित यांच्या कन्या नयना गावित या तिघांमध्ये स्पर्धा होती. त्यात अनिलकुमार अहेर यांनी माघार घेतल्याने गावित व चारोस्कर यांच्यात स्पर्धा कायम होती म्हणून कॉँग्रेसच्या मंडळींनी चिठ्ठी काढून उमेदवार ठरविण्याचा निर्णय घेतला. अखेर चिठ्ठीद्वारे नयना गावित यांचे नाव निघाल्याने प्रश्न सुटला.