शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवळा शहराची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:10 IST

देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सी.सी. टि. व्हि. यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाºयावर असून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरासाठी अनेक उणीवा जाणवत आहेत.

ठळक मुद्देखबरदारी आवश्यक : सीसीटीव्ही यंत्रणेची आवश्यकता

देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सी.सी. टि. व्हि. यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाºयावर असून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरासाठी अनेक उणीवा जाणवत आहेत.देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर शहराची वाटचाल स्वच्छ व सुंदर देवळा हि संकल्पना पूर्ण करण्याच्या दिशेने सुरू आहे.चार वर्षांपूर्वी तत्कालीन देवळा ग्रामपंचायतीला तंटामुक्ती पुरस्काराचे मिळालेले ७ लाख रु पये शहरात सी.सी. टि. व्ही. यंत्रणा बसविण्यासाठी वापरण्यात आले. याचे नियंत्रण पोलिस ठाण्यात असल्यामुळे शहरात घडणाºया कोणत्याही घटनेची सुचना पोलिसांना त्वरीत मिळू लागल्यामुळे पोलिसांना त्वरीत निर्णय घेऊन कार्यवाही करता येऊ लागली. त्यामुळे सी.सी. टि. व्हि. यंत्रणेचा योग्य वापर करत गुन्हेगार, रोडरोमिओंना चांगलाच आळा घातला होता. कालांतराने हया यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर तिचा दुरु स्ती व देखभालीचा खर्च कोणी करावयाचा यावरून पोलिस व नगरपंचायत प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला. हया वादातच हळूहळू शहरातील सर्व सी.सी. टि. व्हि. यंत्रणा कायमचीच बंद पडली. सदरचे सी.सी. टि. व्हि. केवळ शोभेचे बाहुलेच ठरले. कालांतराने सर्व साहीत्य गायब झाले. याची कोणतीही दखल पोलिस खात्याने किंवा नगर पंचायत प्रशासनाने घेतली नाही, यामुळे गाव तंटामुक्तीसाठी बक्षिसापोटी मिळालेले पैसे पाण्यात गेले. मात्र शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली सीसीटीव्ही यंत्रणा दोन वर्षांपासून बंदअसल्याने धाडसी घरफोडयांबरोबरच लहानमोठ्या गुन्हेगारी घटना, तसेच दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना नियमितपणे घडत असल्यामुळे नागरीकांचे मोठे नुकसान होत आहे.