शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अबब..! नाशकात १४ हजार खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:18 IST

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप केले आहे. या खड्यांमध्ये किमान ४ फुट तर कमाल १० फुट खड्डे आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमापकिमान ४ फुट तर कमाल १० फुट खड्डे शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे

नाशिक : शहरात सर्वत्र खड्यांचे साम्राज्य झाले असून गेल्या अनेक वर्षांपासुन रत्यांची एकसारखी चाळण होत आहे. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप केले आहे. या खड्यांमध्ये किमान ४ फुट तर कमाल १० फुट खड्डे आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.आहिरे हे गेल्या पाच वर्षांपासून एक सामाजिक कार्य म्हणुन आणि सत्ताधारांचे लक्ष या खड्यांकडे जाऊन त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी शहरभर फिरत आहे. शहरात दिवसागणिक खड्यांची संख्या वाढतच असल्याचे निर्दशनास येत असुन शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावेळी खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वाहन चालकांचा अपघात झाल्याचे दिसत आहे. अशावेळी खड्यांमद्ये तात्पुरत्या स्वरुपात मुरुम टाकण्यात येतो त्यामुळे असे ठिकाण अपघातांना अजुन निमंत्रण देत आहेत. रस्ते महापालिका हद्दीत असो अथवा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग असो या सर्व परिसरात खड्यांची अवस्था एकसारखीच आढळत असल्याचे अहिरे यांनी सांगितले.खड्यांच्या संख्येत अजून वाढ शहरात मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सर्वच भागांत खड्डे बघायला मिळत होते. महापालिकडून हे खड्डे बुजविण्याठी मुरुमाचा वापर करण्यात येतो मात्र अशाच ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच पुन्हा शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असल्यामुळे खड्यांच्या संख्येत अजून वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवुन कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरुन अशा ठिकाणी अपघात होणार नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा