शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शाहीस्नानाच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी साध्वी त्रिकाल भवंता न्यायालयात

By admin | Updated: August 27, 2015 00:08 IST

दावा दाखल : स्नानासाठी सीताकुंडाची मागणी

नाशिक : सिंहस्थात शैव व वैष्णव आखाड्यांची पेशव्यांनी स्नाननिश्चिती केली त्यावेळी साध्वींचा स्वतंत्र आखाडा अस्तित्वात नव्हता़ मात्र, २०१३ मध्ये अलाहाबादला स्वतंत्र महिला आखाड्याची निर्मिती झाली असून नाशिक सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीच्या दिवशी महिला साध्वींच्या स्नानासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था व वेळ द्यावी या मागणीसाठी साध्वी त्रिकाल भवंता यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात बुधवारी (दि़२६) दावा दाखल केला असून त्यावर गुरुवारी (दि़ २७) निर्णय होण्याची शक्यता आहे़वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश राजेश पटारे यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये सिंहस्थ हा चारशे वर्षांपूर्वी कावनई येथे होत होता़ त्यामध्ये साधू-महंतांमध्ये वाद होऊन सुमारे पंधरा हजार साधू मारले गेले होते़ याची दखल पेशव्यांनी घेऊन वैष्णवांच्या स्नानासाठी नाशिकमधील रामकुंड तर शैव पंथीयांसाठी त्र्यंबकेश्वर कुशावर्तामध्ये विभागणी केली़ तेव्हापासून नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीस्नान होण्यास सुरुवात झाली़ तेव्हापासून तर आजपर्यंत पेशवाई मिरवणुका काढल्या जातात़पेशव्यांनी ज्यावेळी हा निर्णय घेतला त्यावेळी केवळ पुरुष साधू होते त्यामुळे महिला साध्वींच्या स्नानाचा प्रश्न निर्माण झाला नाही़; मात्र २०१३ मध्ये अलाहाबादला साध्वींच्या स्वतंत्र आखाड्याची निर्मिती झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला असून पुरुष साधूंप्रमाणेच साध्वींच्या शाहीस्नानासाठी स्वतंत्र व्यवस्थेची मागणी करीत आहोत़; मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसून नाईलाजाने न्यायालयाकडे दाद मागावी लागते आहे़ साधू-महंतांचे शाहीस्नान आटोपल्यानंतरची वा सीताकुंडात जरी स्नानाची परवानगी मिळाली तरी ती मान्य असल्याचे दाव्यामध्ये म्हटले आहे़ या दाव्यामध्ये साध्वी त्रिकाल भवंता यांच्या दाव्यामध्ये अ‍ॅड़ प्रशांत जोशी काम पाहत आहेत़ तर सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ राजेंद्र घुमरे गुरुवारी (दि़ २७) न्यायालयात मांडणार आहेत़ दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालय याबाबत प्रशासनास आदेश देण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)