शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सादरे आत्महत्त्या प्रकरण : चौधरींच्या गुन्ह्यांची यादी न्यायाधीशांकडे सादर

By admin | Updated: October 27, 2015 00:27 IST

अटकपूर्व जामिनावर बुधवारी सुनावणी

नाशिक : जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी (दि़ २८) दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद केला जाणार असून, त्यानंतर सुनावणी होणार आहे़ सोमवारी (दि़ २६) दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपले लिखित म्हणणे न्यायाधीश एस़ आऱ कदम यांच्याकडे सुपूर्द केले़आत्महत्त्येपूर्वी पोलीस निरीक्षक सादरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार जळगावचे गामीण पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील संशयित चौधरी यांनी २० आॅक्टोबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ जिल्हा व सत्र न्यायाधीश कदम यांच्या न्यायालयात सरकार पक्षाचे अ‍ॅड़ राजेंद्र घुमरे, फिर्यादी माधुरी सादरे यांचे वकील उमेश वालझाडे, तर चौधरीचे वकील मुकेश श्ािंपी व बिपीन पांडे यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले़ त्यामध्ये सरकारी वकिलांनी पोलीस निरीक्षक सादरे यांची चिठ्ठी, चौधरी यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे तसेच विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तांची कात्रणे सादर केली. चौधरीचे वकील शिंपी व पांडे यांनी सरकार पक्षाने दिलेल्या लेखी म्हणण्यावर युक्तिवादासाठी दोन दिवसांचा वेळ मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली़या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीच्या वेळी सादरे यांच्या पत्नी माधुरी, भाऊ प्रवीण, मुलगी पूनम हजर होते़ यावेळी सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने न्यायालयात हजर होते़ या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीप्रसंगी चौधरी समर्थकांनी न्यायालयात मोठी गर्दी केली होती़ (प्रतिनिधी)