शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा एकवटला; शहरवासीयांचे हाल

By admin | Updated: June 2, 2017 01:57 IST

बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतीमालाला योग्य हमीभाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा’ अशा एकूण सात मागण्यांसाठी राज्याचा पोशिंदा बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले. यामुळे पंचवटीमधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळपासून ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. याबरोबरच शहरवासीयांना कांद्यापासून तर विविध प्रकारच्या भाज्या व फळभाज्या किरकोळ बाजारातून जादा दराने खरेदी कराव्या लागल्या. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचे किंवा त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि अखेर राज्यातील बळीराजाने बेमुदत कालावधीसाठी ‘सुटी’ घेत शहराची रसद रोखली. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेपासून सुरू झालेल्या संपाचे पडसाद सूर्योदयानंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पहावयास मिळाले. पंचवटीमधील बाजार समितीचे शटर बुधवारी संध्याकाळनंतर उघडलेच नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संपामुळे बाजार समितीमधील व्यवहार कोलमडले. बाजार समितीमध्ये कु ठल्याही प्रकारचा भाजीपाला उपलब्ध झाला नाही. यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीमध्ये पाऊ ल ठेवले नाही. किरकोळ भाजीबाजारात भाजीविक्रेत्यांकडून बुधवारी जादा माल खरेदी करण्यात आला होता. यामुळे शहरातील भद्रकाली, रविवार कारंजा, जुने नाशिक, गंगापूररोड, महात्मानगर आदि परिसरात भाजीविक्रेत्यांनी दुकाने नियमितपणे सुरू ठेवली होती. संध्याकाळीदेखील काही उपनगरांमध्ये भाजीबाजार थाटण्यात आला होता. मात्र भाजीपाला किंवा फळभाज्यांचा जास्त साठादेखील करणे लहान विक्रेत्यांना शक्य नाही, कारण हा नाशवंत माल असतो. यामुळे जर बाजार समित्यांमधील व्यवहार शुक्रवारी (दि.२) पूर्ववत झाले नाही तर मात्र नाशिककरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजीपाला, फळभाज्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. कारण किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला खरेदी करण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध राहणार नसल्यामुळे शहरातील विविध उपनगरांमधील भाजीबाजारही आपोआप बंद होण्याचा धोका उद्भवू शकतो.