शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

सायखेड्यात कांद्याला ७०० रुपये भाव

By admin | Updated: August 24, 2016 01:14 IST

एका शेतकऱ्याला मात्र पाच रुपये क्विंटलचा भाव

नाशिक : जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सध्या कांद्याला सरासरी ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. काही शेतकरी पुरामुळे ओला होऊन अत्यंत खराब झालेला कांदाही बाजारात आणत असल्याने त्याचा भाव कमी पुकारला जात असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सायखेडा बाजारात सोमवार आणि मंगळवारी कांद्याला सरासरी ६०० ते जास्तीत जास्त ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला असल्याची माहिती कांदा व्यापारी सुरेश कमानकर यांनी दिली. सोमवारी सायखेडा बाजारात एका शेतकऱ्याने पुराच्या पाण्यामुळे अत्यंत खराब झालेला कांदा आणि त्याच शेजारी थोडा बऱ्यापैकी पण तोही खराबच असा कांदा विक्रीसाठी आणला होता. जो कांदा बऱ्यापैकी होता त्याला क्विंटलला २५ रुपये भाव पुकारण्यात आला आणि जो कांदा अत्यंत खराब होता त्याचे वजन चांगल्या कांद्याबरोबर न करता तो पाच रुपये क्विंटलने देण्याचे शेतकऱ्यास सांगण्यात आले होते. कांद्याला कमी भाव मिळाल्याने संबंधित शेतकऱ्याने व्यापाऱ्याकडे कांदा खाली केलाच नसल्याचे कमानकर यांनी सांगितले. एकदमच खराब असलेला कांदा घेऊनही व्यापाऱ्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याला तो माल फेकूनच द्यावा लागतो. यासाठी शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी कांदा माल बाजारात आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.