शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:14 IST

नांदगावसाठी शनिवारी लस उपलब्ध नव्हती. तरीही लसीकरणासाठी येण्याचा संदेश सोशल मीडियातून प्रसारित झाल्याने लोकांनी गर्दी केली. सकाळी ७ वाजेपासून ...

नांदगावसाठी शनिवारी लस उपलब्ध नव्हती. तरीही लसीकरणासाठी येण्याचा संदेश सोशल मीडियातून प्रसारित झाल्याने लोकांनी गर्दी केली. सकाळी ७ वाजेपासून लोक रांगेत उभे राहिले. त्याचा गैरफायदा घेऊन काहींनी एका कागदावर अनुक्रम टाकून नावे लिहिण्यास सुरुवात केली. सदरचा अनधिकृत प्रकार ११ वाजेपर्यंत सुरू होता व कागदावरची यादी २०० पेक्षा पुढे गेली. परंतु सत्य सांगण्यासाठी आरोग्य विभागाचा एकही माणूस तिथे हजर नव्हता. सोशल मीडियातून लस उपलब्ध असण्याचा मेसेज आल्याने लसीकरणाच्या अपेक्षेने लोक आले होते.

सामाजिक अंतर व मास्कचे नियम धाब्यावर बसवून लोक रांगा लावून व जागोजागी घोळके करून लस येण्याची वाट पाहत उभे राहिले. दरम्यान, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार उदय कुलकर्णी यांना संपर्क केला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

दरम्यान, हिसवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे लसीकरण अचानक रद्द झाल्याने तिथला ७० लसींचा डोस नांदगावकडे वळविण्यात आला. त्याचा आधार नांदगावला मिळाला. जैन धर्मशाळेचे संचालक रिखब कासलीवाल, नूतन कासलीवाल यांनी आरोग्य विभागाने पुरेसे संख्याबळ व बंदोबस्त दिला नसल्याने गोंधळ झाल्याची प्रतिक्रिया दिली, तर देशात असेच चालले आहे. मी तरी काय करणार, अशी उद्‌विग्न प्रतिक्रिया तहसीलदार कुलकर्णी यांनी दिली.

ढिसाळ नियोजन अत्यंत वेदनादायी असून, जमलेल्या जनसमुदायामुळे कोरोनाचा शहरात उद्रेक होऊ शकतो. आजच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार झाला तर मोठी किंमत मोजावी लागेल.

- संतोष गुप्ता, माजी नगरसेवक, नांदगाव

इन्फो

चांदोरीत लसीकरणासाठी झुंबड

चांदोरी : संपूर्ण राज्यात लसीकरण सुरू असताना लसीचा तुटवडा निर्माण झाला असल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण ठप्प झाले होते. निफाड तालुक्यातील चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर मागील २ आठवड्यांपासून लसीकरण ठप्प होते, त्या अगोदर फक्त १०० डोस येत असल्याने अनेक नागरिकांना लसीविनाच माघारी जावे लागले होते. चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तेरा गावे असून, त्यातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र मागील २ आठवडे लस नसल्याने शनिवारी (दि. ८ ) लस उपलब्ध होताच नागरिकांची तोबा गर्दी उसळली. पहाटे ५.३० वाजेपासून नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली होती. मात्र अवघे २०० डोस उपलब्ध असताना दुसरा डोस असलेल्या नागरिकांना यात प्राधान्य देण्यात आले होते. जवळपास ४०० हून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

कोट...

चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला लसीचा अधिक पुरवठा करण्यात यावा व चांदोरी गावाच्या लोकसंख्येचा विचार करता येथे ज्याप्रमाणे मतदानप्रक्रिया राबविली जाते त्याचप्रमाणे प्रभागनिहाय व प्रत्येक प्रभागाला दिवस ठरवून लसीकरण करण्यात यावे. जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही.

- सिद्धार्थ वनारसे , सदस्य, जिल्हा परिषद

फोटो - ०८ चांदोरी लसीकरण

चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी झालेली गर्दी व सामाजिक अंतराचा नागरिकांकडून उडालेला फज्जा.

फोटो - ०८ नांदगाव लसीकरण

नांदगाव येथील जैन धर्मशाळेत लसीकरणासाठी झालेली गर्दी.

===Photopath===

080521\08nsk_23_08052021_13.jpg

===Caption===

फोटो - ०८ नांदगाव लसीकरण नांदगाव येथील जैन धर्मशाळेत लसीकरणासाठी झालेली गर्दी.