शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या तक्रारीसाठी आता ग्रामीण पोलिसांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’

By admin | Updated: October 16, 2015 21:59 IST

ग्रामीण पोलिसांचा स्मार्टनेस : स्वतंत्र पोलिसांची नेमणूक, २४ तास कार्यरत

नाशिक : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा उपयोग करून घेण्याचा चांगला निर्णय ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी घेतला आहे़ ग्रामीण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या संख्येने वापरले जाणारे मोबाइलमधील व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ते जिल्'ातील नागरिकांशी संवाद साधणार असून दोन व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकही त्यांनी जाहीर केले आहेत़ आपल्या परिसरातील अवैध धंदे, गुन्हेविषयक माहिती नागरिकांनी बिनदिक्कतपणे ग्रामीण पोलिसांच्या या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे़जिल्हाभरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी / सूचनांची तत्काळ दखल घेतली जाणार आहे़ तसेच यामुळे पोलिसांना माहितीबरोबरच घटनास्थळी पोहोचून कार्यवाही करण्यास चांगलीच मदत होणार आहे़ यामध्ये नागरिकांना वाहतूक नियंत्रण समस्या, शस्त्र / इतर परवाने, अर्ज चौकशी, गुन्हेगारांबाबत माहिती, दहशतवादी कृत्याबाबत माहिती, समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासंबंधाचे संदेश, नागरिकांच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतच्या तक्रारी, घटनास्थळांचे फोटो अथवा व्हिडीओ क्लिप्स पाठविता येणार आहे़ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर नागरिकांना रोजच्या दैनंदिन जीवनात रस्त्यावर, गल्लीत वा परिसरात घडणारे अनुचित प्रकार, दंगल, अफवा पसरविणे, मारहाणीचे प्रकार, घातक शस्त्र व स्फोटके बाळगताना आढळल्यास, शाळा/ महाविद्यालयांची ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री, मुलींची छेडछाड, टवाळखोर, दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणारे फलक, व्हिडीओ क्लिप, परिसरातील संशयित व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या बेवारस वस्तू आदिंची माहिती देता येणार आहे़नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्'ातील नागरिकांसाठी खुले केलेल्या या दोन व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकामुळे जनतेच्या मनात पोलिसांबाबत विश्वास व सहकार्य निर्माण होण्यास तसेच सामान्य व पीडित व्यक्तींना तातडीने मदत मिळून गुन्हेगारीस अटकाव करण्यासाठी निश्चित मदत मिळणार आहे़ (प्रतिनिधी)’ नाशिक : मुंबईतील रहिवासी रमेशचंद्र सीताराम सोनी हे रामकुंडावर अंघोळीसाठी आले असता चोरट्यांनी त्यांचा मोबाइल व रोख रक्कम असा सात हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़