शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण बससेवा विस्कळीत

By admin | Updated: February 1, 2017 01:46 IST

ग्रामीण बससेवा विस्कळीत

नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाच्या करवाढीविरोधात माल वाहतूकदार व प्रवासी वाहतूकदार तर आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचाया वतीने पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाचा बससेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही. शहर बससेवा सकाळपासून सुरळीत असल्याचा दावा राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या प्रशासनाने केला आहे.चक्का जाम आंदोलनामुळे शहर बससेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र सकाळी अकरा वाजता द्वारका, महामार्गावरील अमृतधाम चौफुली, त्र्यंबक रस्त्यावरील बेजे फाटा तसेच निफाडजवळील चांदोरी या ठिकाणी चक्काजाम आंदोलनासाठी आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्यामुळे नाशिकहून वरील मार्गावर साडेअकरा वाजेनंतर सुटणाऱ्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे त्र्यंबकेश्वर, नाशिकरोड, सायखेडा, ओझरकडे जाणारी बस वाहतूक विस्कळीत झाली होती. अन्य मार्गावरील शहर बस वाहतूक दिवसभर सुरळीत असल्याचा दावा विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केला आहे.शहर व ग्रामीण बससेवा आंदोलनामुळे खूप प्रभावित झाली नाही. सर्व फेऱ्या नियमित सुरू होत्या, असे जरी प्रशासनाच्या वतीने जोशी यांनी सांगितले असले तरी शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांना बसेसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे रहावे लागल्याचे चित्र होते, तर आगारही बसेसच्या पार्किंगमुळे हाऊसफुल झाले होते. अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील काही मार्गांवरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.