शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

चालत्या वाहनातील थरार : नाशकात वाळूमाफियांची दादागिरी, गुन्हा दाखल

By admin | Updated: March 30, 2015 00:09 IST

तलाठ्यास ट्रकमधून फेकले

सिडको : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांची दादागिरी चांगलीच वाढली असून, सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेला ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्याच्या नावाखाली लहवितचे तलाठी अरुण पाटील यांना चालत्या ट्रकमधून खाली ढकलून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी घडली़ या घटनेनंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले, तर दुसऱ्या घटनेत एक ट्रक जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अनधिकृत गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखून वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार गणेश राठोड यांनी बुधवारी (दि़ २५) मंडल अधिकारी व तलाठी यांच्या बैठकीत दिले होते़ त्यानुसार तहसीलदार राठोड यांनी तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांची दोन भरारी पथके तयार केली़ त्यातील पहिल्या पथकात पी़ डी़ गोंडाळे (मंडल अधिकारी, देवळाली), अरुण पाटील (तलाठी, लहवित), अण्णा डावरे (तलाठी, देवळाली), नीळकंठ उगले (तलाठी, पाथर्डी), एऩ एस़ बनसोड (तलाठी, पिंपळद), तर दुसऱ्या पथकात एस़ एम़ शेख (मंडल अधिकारी, शिंदे), आऱ आऱ कागदे (तलाठी, पळसे), बी़ एस़ काळे (तलाठी, शिंदे), सुनील चांडोले (तलाठी, नाणेगाव) एस़ जी़ साळी (तलाठी एकलहरे) यांचा समावेश होता़रविवारी (दि़ २९) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पहिले पथक नाशिक- मुंबई उड्डाणपुलाच्या खाली तपोवन हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडवर, (पान ५ वर)तर दुसरे पथक नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या पाथर्डी भागातील उड्डाण पुलावर तैनात करण्यात आले होते़ सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे जाणारा एक दहा चाकी ट्रक वाळू घेऊन जात होता़ या ट्रकला नंबरप्लेट नव्हती तसेच ट्रॉलीवर असलेला नंबरही ग्रीस लावून पूर्णपणे झाकलेला होता़ या ट्रकबाबत संशय आल्याने पहिल्या पथकाने या ट्रकला थांबवून ट्रकचालकास त्याचे व मालकाचे नाव ट्रकची कागदपत्रे, परवाने, वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने काहीही नसल्याने सांगितले.त्यामुळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी चालकास ट्रक तहसीलदार कार्यालयात जमा करण्यास सांगून या ट्रकमध्ये तलाठी अरुण पाटील स्वत: बसले़ चालकाने हुंडाई शोरूमजवळ ट्रक थांबवून ट्रक पकडल्याची माहिती साथीदारांना मोबाइलवरून देऊन बोलावून घेतले़ यामुळे पाटील यांनी ट्रकचालकाचा मोबाइल जमा करून घेतल्यानंतर काही वेळातच सफेद रंगाच्या कारमधून दोन व बुलेटवरून एक असे तीन साथीदार तिथे आले़ त्यांनी पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली़