शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांची पंचनाम्यासाठी धावाधाव

By admin | Updated: August 21, 2016 02:06 IST

विमा कंपनीकडून नुकसानभरपाई : यंत्रणेवर दबाव

नाशिक : सलग चोवीस तास धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे शहरातील गोदावरीसह नासर्डी, वाघाडी नदीला आलेल्या पुराचे दुकानांमध्ये पाणी शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी व्यावसायिकांची तीन आठवड्यानंतरही धावाधाव सुरू असून, आजवर आठशेहून अधिक पंचनामे करण्यात आले असले तरी, दररोज किमान दहा ते पंधरा व्यावसायिकांचे अर्ज तहसील कार्यालयात येऊन धडकत आहेत. दि. २ आॅगस्ट रोजी नाशिकसह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली, गंगापूर धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. त्याचबरोबर गोदावरीला येऊन मिळणारे नालेही दुथडी भरून वाहिले, नासर्डी व वाघाडी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहिल्याने गोदावरीनेही रौद्ररूप धारण केले. नदीकाठच्या भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नागरिकांचे संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या, तर शहरातील सराफ बाजार, कापडबाजार, हुंडीवाला लेन, दिल्ली दरवाजा, बालाजी कोट आदि व्यावसायिक ठिकाणीही गोदावरीचे पाणी शिरले. साधारणत: कंबरे एवढे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे कोट्यवधी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. पाण्यात भिजलेल्या मालाचे नंतर सेल लावून कमी किमतीत व्यावसायिकांनी विक्री केली असली तरी, अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या मालाचा विमा काढला असल्याने कंपनीकडे नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेला पंचनामा त्यासाठी आवश्यक आहे, परंतु शासकीय यंत्रणेने अगोदर नदीकाठच्या रहिवाशांच्या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याला प्राधान्य दिले, सलग आठ ते दहा दिवस जवळपास साडेतीन हजार कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले, त्यात झालेले नुकसान, घराचा वर्ग आदि बाबी नमूद करण्यात आल्या. त्यानंतर मात्र व्यावसायिकदार, दुकानदारांनी आपल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूल खात्याकडे तगादा लावायला सुरुवात केली आहे. आजवर आठशेहून अधिक दुकानदारांचे पंचनामे करण्यात आले असून, तरीही दररोज दहा ते पंधरा दुकानदारांचे तहसील कार्यालयात अर्ज येऊन धडकत आहे. विमा कंपन्या नुकसानभरपाईच्या दाव्यासाठी शासकीय यंत्रणेचा पंचनामा ग्राह्य धरत आहेत, त्यामुळे पंचनाम्यासाठी महसूल यंत्रणेवर दबाव वाढला आहे. (प्रतिनिधी)