शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

हरणावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:12 IST

पाण्याच्या शोधात आलेल्या एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे घडली. परिसरातील नागरिकांनी या हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्यामुळे जीवदान मिळाले. जखमी हरणावर उपचार केल्यानंतर त्याला वनविभाग कर्मचाऱ्यांच्या हवाली करण्यात आले.

मनमाड : पाण्याच्या शोधात आलेल्या एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे घडली. परिसरातील नागरिकांनी या हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्यामुळे जीवदान मिळाले. जखमी हरणावर उपचार केल्यानंतर त्याला वनविभाग कर्मचाऱ्यांच्या हवाली करण्यात आले.  पानेवाडी गावाजवळ असलेल्या जंगलात मोकाट कुत्र्यांनी हरणावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी हरीण इकडे-तिकडे सैरावैरा पळत होते; मात्र कुत्र्यांनी त्याला पकडून त्याला चावा घेण्यास सुरु वात केली. सुदैवाने सरपंच अंकुश कातकडे, धनराज कातकडे, अक्षय कातकडे, भीमराज कातकडे, वाल्मीक कातकडे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी कुत्र्यांच्या तावडीत हरीण सापडल्याचे पाहून तिकडे धाव घेतली. त्यामुळे हरणाला सोडून कुत्रे पळून गेले. जखमी हरणावर उपचार करण्यात आल्याने प्राण वाचले. सरपंच कातकाडे यांनी वनविभागाच्या अधिकाºयाशी संपर्क साधून त्यांना हरणाची माहिती दिली. अधिकाºयांनी येऊन जखमी हरीण ताब्यात घेतले.भारत बचाव महारथ यात्रा आज मालेगावी  मालेगाव : लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्यासाठी निघालेल्या भारत वाचवा महारथयात्रेचे गुरुवारी दुपारी २ वाजता मालेगावी आगमन होत आहे. वेरूळ येथून निघालेली ही महारथयात्रा शहरातील रामसेतू पुलानजीक श्रीराम मंदिराजवळ येणार असून तेथून धुळ्याकडे प्रयाण करणार आहे. यावेळी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, जनार्दन स्वामी वेरूळ आश्रमाचे एस. पी. सिन्हा, कर्नल टी. पी. एस. त्यागी, शामजी महाराज उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :dogकुत्रा