शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारसाहित्य खरेदीसाठी धाव

By admin | Updated: February 11, 2017 00:30 IST

दुकाने गजबजली : माघारीनंतर खऱ्या रणधुमाळीला सुरुवात

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला बुधवारपासून (दि.८) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. प्रचार करण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक प्रचार साहित्यविक्रीच्या दुकानांकडे धाव घेतली जात आहे.महापालिका निवडणुक ीच्या माघारीनंतर प्रचाराला उमदेवारांनी जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासूनच विविध पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही प्रचारफेऱ्या काढण्यास सुरुवात केली. निवडणूक प्रचार साहित्याच्या किमती यंदा वाढल्या असून, शहरातील मेनरोड, अशोकस्तंभ, नाशिकरोड भागातील दुकानांवर गर्दी होऊ लागली आहे. माघारीनंतर अपक्ष उमेदवारांचीदेखील प्रचार साहित्य खरेदीसाठी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.टोप्या, मफलर, निवडणूक चिन्ह, झेंडे, पताका, टीशर्ट, स्टिकर खरेदीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. एकूणच प्रचार साहित्य खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सर्वप्रथम उमेदवारांकडून निवडणूक प्रचार साहित्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे असे सर्वच पक्षांचे साहित्य एकत्र सुखाने नांदत असल्याचे चित्र आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वच प्रचार साहित्य महागले आहे. विविध निवडणूक चिन्हांचे आगळे प्रकार उपलब्ध झाले आहेत. कागदापासून तर प्लॅस्टिक व मेटलमध्येदेखील बिल्ले, बॅच बाजारात आले आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यापासून प्रचार साहित्य खरेदीसाठी कार्यकर्त्यांची पावले दुकानांकडे वळू लागली आहेत. छाननीनंतर मात्र खरेदीला वेग आला असून माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांनी प्रचार साहित्य खरेदीवर भर दिला आहे. झेंडे, टोप्या शेकड्यावर तर बॅचेस डझनावर विकले जात आहे.जुने नाशिक येथे ठिकठिकाणी प्रचार साहित्याचे दुकाने थाटली आहेत.