शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्बची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST

विमान कंपनीशी वाद झाल्याने एका प्रवाशाने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. हैदराबादला जाण्यासाठी एका प्रवाशाने ऑनलाइन बुकिंग केले. ...

विमान कंपनीशी वाद झाल्याने एका प्रवाशाने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. हैदराबादला जाण्यासाठी एका प्रवाशाने ऑनलाइन बुकिंग केले. मात्र बुकिंग करताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्याचे बुकिंग होऊ शकले नाही. यामुळे ओझर विमानतळावर येत त्या प्रवाशाने येथे सेवा देणाऱ्या विमान उड्डाण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी त्यास दुसरे तिकीट काढण्यास सांगितले असता त्याने तिकीट न काढता हुज्जत घालून ओझर विमानतळावरील तिकीट काउंटर सोडले. येथून बाहेर पडल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात निनावी कॉल करून नाशिकवरून हैदराबाद येथे जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. यानंतर ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब शोधक व नाशक पथकाला सोबत घेत ओझर विमानतळ गाठले. सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या विमानातून खाली उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली. या वेळी विमानामध्ये कुठल्याही प्रकारची बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे प्रवाशाने हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आणि एक प्रकारे अफवा पसरविल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

इन्फो...

ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्यानंतर संशयित उच्चभ्रू प्रवाशाने ओझर येथून पळ काढला होता. पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक प्रवासी काउंटरवरील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालताना दिसून आला. यावरून प्रवाशाचे वर्णन आणि त्याने ज्या मोबाइल क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केलेला होता तो क्रमांक पोलिसांनी ट्रॅक करून त्याला नाशिक शहरातून रात्री दहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्याच्याविरुद्ध अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसांकडून केले जात होते.

इन्फो...

विमानामध्ये कुठल्याही प्रकारची बॉम्बसदृश वस्तू आढळून आलेली नाही. प्रवाशांनी घाबरून न जाता अफवा पसरवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. नाशिक ते हैदराबाद असे उड्डाण करणारे हे विमान रात्री अकरा वाजेपर्यंत विमानतळावरून टेक ऑफ झालेले नव्हते.