शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारातील घटक पक्षही भाजपाला दणका देणार

By admin | Updated: February 10, 2017 00:28 IST

वीस उमेदवार : अन्य ठिकाणी पुरस्कृत

नाशिक : राज्यात भाजपाबरोबर सत्तेत असूनही महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा वाटा न मिळाल्याने छोटे पक्ष नाराज आहेत. त्यांनी कुवतीनुसार उमेदवार उभे केले आहेत. परंतु त्याही पलीकडे जाऊन आता भाजपाला देणका देण्याची तयारी सुरू असून, विरोधकांना पुरस्कृत करण्याची तयारी सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी ही माहिती दिली.महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांत युती आघाडीचे दिवस सुरू झाल्यानंतर राज्यात भाजपाबरोबरच सत्तेत असलेल्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन आघाडी केली. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं आणि रासपाचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय संभाजी ब्रिगेडसह अन्य काही पक्षही सहभागी होते. भाजपाने महापालिका निवडणुकीत काही जागा घटक पक्षांना मिळाव्या अन्यथा स्वबळावर लढवू, असा इशारा त्यांनी दिला होता. परंतु नाशिक भाजपात प्रथमच इच्छुकांची संख्या वाढल्याने या पक्षाने छोट्या मित्रपक्षांशी चर्चा करू करू म्हणत म्हणत अखेरपर्यंत झुलवले. छोट्या पक्षांची नाशिकमध्ये पुरेशी ताकद नाही, परंतु तरीही चर्चा करू असे सांगत भाजपाच्या नेत्यांनी टाळाटाळ केल्याने अखेरपर्यंत या पक्षांना युतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे छोट्या पक्षांनी एकूण २० उमेदवार उभे केल्याचे हंसराज वडघुले यांनी सांगितले.विशेष म्हणजे आता भाजपाच्या विरोधात या पक्षांनी दंड थोपटले आहेत. भाजपा विरुद्ध मतदारात नाराजीचे वातावरण आहे. अर्थसंकल्पातही भाजपाने सर्वसामान्य नागरिकांचा विचार केलेला दिसत नाही, अशा स्थितीत भाजपाला धक्का देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी घटक पक्षांचे उमेदवार नाही, अशा ठिकाणी भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांना त्यातही बहुतांशी शिवसेनेला समर्थन देण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा उत्साहात असलेल्या भाजपाला निवडणुकीत भाजपा विरुद्ध सर्व अशा पद्धतीने संघर्ष करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)