शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

सत्ताधाऱ्यांना ‘खंडी’भर, विरोधकांना ‘लोटी’भर

By admin | Updated: December 22, 2015 23:18 IST

संघर्ष : जनसुविधेची साडेतेरा कोटींची कामे मंजूर, कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर अन्याय?

नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर करण्यात येणाऱ्या जनसुविधेच्या कामांना सोमवारी (२१) घाईगर्दीत मंजुरी दिल्याचे व त्यातून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सत्ताधारी आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात कोटीच्या कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देताना नांदगाव, येवला, इगतपुरी, कळवणसारख्या विरोधी आमदारांच्या मतदारसंघात मात्र लाखांचाच निधी दिल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीत असंतोष पसरल्याची चर्चा आहे.मंगळवारीच (दि.२२) जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला जिल्हा नियोजन मंडळाकडून सन २०१५-१६ च्या जनसुविधा कार्यक्रमांतर्गत मंजूर कामांची यादी व त्यासाठी मंजूर असलेल्या १३ कोटी ६४ लाखांच्या निधी मंजुरीचे पत्र मिळाले. ग्रामपंचायत विभागाने यासाठी तत्काळ निधी मागणीचे पत्र पाठवावे, असे आदेशही जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सुमारे १११ कोटींची तरतूद जनसुविधांच्या कामांना मंजूर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावावर चर्चा होऊन जनसुविधांच्या कामांसाठी १४ कोटी ९८ लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात या कामांसाठी आता १३ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून १५ तालुक्यांत २२६ जनसुविधेची कामे करण्यात येणार आहेत. त्यात स्मशानभूमी शेड बांधणे, स्मशानभूमीची अनुषंगिक कामे करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे आदि कामांचा समावेश आहे. ग्रामीण भागात देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार डॉ. राहुल अहेर असल्याने देवळा व चांदवड मिळून अनुक्रमे ६९ व ८४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच निफाड व सिन्नरला शिवसेनेचे आमदार असल्याने येथे अनुक्रमे एक कोटी २१ लाख व १ कोटी ११ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मालेगावला सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ असल्याने तेथे सर्वाधिक एक कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या मानाने दिंडोरी व बागलाणला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार असल्याने तेथे अनुक्रमे १ कोटी २० लाख व १ कोटी १३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या येवल्यासाठी अवघा ६० लाख, तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या नांदगावसाठी ५७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या समान निधी वाटपामुळे आता सत्ताधारी विरुद्ध विरोधी आमदार व जिल्हा परिषद सदस्यांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

अधिकारी रजेवरजिल्हा नियोजन अधिकारी प्रवीण पोद्दार हे आठ दिवसांच्या खासगी रजेवर गेल्याचे वृत्त आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधेच्या प्रस्तावांना मंजुरी जरी पालकमंत्र्यांनी दिलेली आहे. तसेच निधी वाटपात झालेली असमानता पाहता यात दोषी कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जनसुविधेच्या प्रस्तावांना मंजुरी व निधी कपातीचे धोरण प्रत्यक्षात जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हाधिकारी हेच या प्रस्तावांची छाननी व तपासणी करीत असल्याने यातील नेमके झारीतील शुक्राचार्य कोण? अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या वतरुळात आहे.