शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गणूर सोसायटीत ३९ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:49 IST

चांदवड : तालुक्यातील गणूर विविध कार्यकारी सोसायटीत ३९ लाख १५ हजार ५०१ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती व लिपिक अशा दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आली आहे.

ठळक मुद्देगैरव्यवहार : तत्कालीन सभापती, लिपिकाला अटक

चांदवड : तालुक्यातील गणूर विविध कार्यकारी सोसायटीत ३९ लाख १५ हजार ५०१ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती व लिपिक अशा दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आली आहे.या प्रकरणी तिघांवर चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास वरिष्ठांकडे सोपविल्यानंतर या प्रकरणी सोसायटीचे तत्कालीन सभापती सुधाकर शिंदे, लिपिक विनायक थेटे यांना अटक करण्यात आली असून, त्यांना चांदवड न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि. १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर माजी सचिव धोंडीराम साठे यांनी अटकपूर्व जामीन घेतल्याचे समजते. या घटनेतील गणूर विविध कार्यकारी सोसायटीचे तत्कालीन सभापती सुधाकर शिंदे, माजी सचिव धोंडीराम साठे, लिपिक विनायक थेटे यांनी पतसंस्थेचे वित्तीय पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना दि. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ या लेखापरीक्षण कालावधीत सोसायटीच्या दैनंदिन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांनी झालेल्या गैरव्यवहाराच्या फेरलेखापरीक्षणासाठी चांदवड तालुका लेखापरीक्षक म्हणून ज्योती घडोजे यांची नेमणूक केली होती. सोसायटीचे सभापती, सचिव, लिपिक यांनी संगनमताने गैरव्यवहार करीत जवळपास ३९ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक ज्योती घडोजे यांनंी चांदवड पोलीस स्टेशनला दिली होती. या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास चौधरी तपास करीत होते. यानंतर विशेष शाखेकडे हा तपास दिल्याने विशेष शाखेच्या पथकाने शिंदे व थेटे यांना अटक करून त्यांना पोलीस कोठडी मिळविली आहे.लेखापरीक्षकांचा ठपकालेखापरीक्षक घडोजे यांनी दि. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत सोसायटीच्या दैनंदिन व्यवहाराची सखोल चौकशी केली. या चौकशीत सोसायटीचे तत्कालीन सभापती सुधाकर शिंदे, माजी सचिव धोंडीराम साठे, लिपिक विनायक थेटे यांनी संस्थेत जमा होणाऱ्या रकमा बॅँकेत भरणा न करता स्वत:च्या हितासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.