शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेच्या बहाण्याने पावणेचार कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

नाशिक : हज यात्रेच्या बहाण्याने २३ यात्रकरूंना जवळपास पावणेचार कोटींचा गंडा घालणाऱ्या जेहान इंटरनॅशनल टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या संचालकाविरुध्द अखेर ...

नाशिक : हज यात्रेच्या बहाण्याने २३ यात्रकरूंना जवळपास पावणेचार कोटींचा गंडा घालणाऱ्या जेहान इंटरनॅशनल टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या संचालकाविरुध्द अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून फसवणुकीच्या रकमेचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतिन अजिज अहमद मनियार ऊर्फ कादरी (रा. रहेनुमा स्कूल, वडाळा रोड) असे संशयित ट्रॅव्हल्स संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुजम्मील युसूफ शेख (रा.मिरजनगर, नागजी चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवित्र हज आणि उमराह या धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी स्वस्तात यात्रेचे आमिष दाखवून संशयिताने यात्रेकरूंची फसवणूक केली आहे. वडाळा रोड येथील रहेनुमा स्कूल परिसरात ऑफिस थाटून त्याने हा उद्योग केला असून संशयिताच्या आमिषाला बळी पडून २०१४ मध्ये तक्रारदार शेख यांनी त्याच्याशी संपर्क केला होता. यावेळी स्वस्तातील पॅकेज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तक्रारदार शेख यांनी आपल्या नातेवाइकांसह आप्तेष्टांनाही या योजनेत भाग घेण्यास प्रवृत्त केले. शेख यांच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी ७१ लाख ५८ हजार ४०० रुपयांची तसेच नसरीबाद येथील यात्रेसाठी २३ यात्रेकरूंनी १ लाख १९ हजार रुपयांची बुकिंग देण्यात आली. ही रक्कम रोख, धनादेश आणि ऑनलाइन माध्यमातून संशयिताने स्वीकारली होती. मात्र २०१८ पर्यंत संशयिताने भाविकांच्या यात्रेची व्यवस्था केली नाही. चार वर्षे उलटूनही यात्रा प्रवासाचे विमान तिकीट अथवा पासपोर्ट आणि तत्सम कामे मार्गी न लावल्याने फसवणुकीचा हा प्रकार यात्रेकरूंच्या लक्षात आला. याच काळात संशयितावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, संशयिताने गाशा गुंडाळल्याने शेख यांनी पोलिसांत धाव घेतली होती. मात्र पोलिसांकडूनही या प्रकरणात दखल घेतली गेली नसल्याने अखेर मुज्जमल शेख यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने मुंबई नाका पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले असून त्यानुसार पोलिसांकडून शुक्रवारी (दि.१३) मतिन अजिज याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.