शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीसाठी तीन हजार कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:48 IST

नाशिक : जिल्ह्याच्या विविध घटकांच्या पतपुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन गुरुवारी (दि. १०) करण्यात आले.

ठळक मुद्दे ३ हजार ७५५ कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट निश्चित मुदत कर्जासाठी २ हजार ४७० कोटी रुपयांच्या योजना

नाशिक : जिल्ह्याच्या विविध घटकांच्या पतपुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन गुरुवारी (दि. १०) करण्यात आले. या आराखड्यात यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी ३ हजार ७५५ कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.गुरुवारी (दि. १०) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते या पतपुरवठ्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लीड बॅँक तथा बॅँक आॅफ महाराष्टÑचे विभागीय व्यवस्थापक दिनेश तांबट, नूतन विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब ताव्हरे, मुख्य व्यवस्थापक भरत बर्वे, बॅँक आॅफ इंडियाचे तुषार पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे किशोर कदम, सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाच्या ममता सिंग, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. यात खरीप पिकांसाठी २ हजार ६२५, तर रब्बी हंगामासाठी ११३० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याचबरोबर कृषी आधारित घटकांसाठी व मुदत कर्जासाठी २ हजार ४७० कोटी रुपयांच्या योजना निश्चित करण्यात आल्या आहेत, असे बॅँक आॅफ महाराष्टÑने तयार केलेल्या पतपुरवठा आरखड्यात नमूद केले आहे. याचबरोबर जिल्ह्णातील बॅँक क्षेत्राच्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. बॅँक शाखांमध्ये वाढ होऊन ४२ बॅँकांच्या एकूण ७८२ शाखा जिल्ह्णात कार्यरत आहेत. विविध स्मॉल फायनान्स बॅँका व खासगी बॅँकांनीदेखील जिल्ह्णात आपला व्यवसाय वाढविल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिक कृषी उत्पादनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असून, निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील बॅँकिंग क्षेत्राने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या पत आराखड्यात जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिकांसाठी एकूण ३ हजार ७५५ कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.