शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

फिरते झुणका-भाकर केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:29 IST

सिन्नर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पहिले लॉकडाउन संपत असतानाच केंद्र सरकारने दुसऱ्यांदा ३ मे पर्यंत लॉकडाउन घोषित केले असून गोरगरीब, कंत्राटी कामगार, विडी कामगार, रोजंदारी करणारे मजूर व समाजातील अनेक घटकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

सिन्नर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पहिले लॉकडाउन संपत असतानाच केंद्र सरकारने दुसऱ्यांदा ३ मे पर्यंत लॉकडाउन घोषित केले असून गोरगरीब, कंत्राटी कामगार, विडी कामगार, रोजंदारी करणारे मजूर व समाजातील अनेक घटकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा गरजू लोकांसाठी ‘कामगार शक्ती’ फाउण्डेशन सरसावली असून, शहरासह उपनगरांतील गरजू लोकांसाठी फिरते झुणका-भाकर केंद्र सुरू करण्यात आले आहे.या फिरत्या झुणका-भाकर केंद्राचा शुभारंभ कमलनगर येथून करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार, मार्गदर्शक किरण भावसार, सरचिटणीस रवींद्र गिरी, खजिनदार किरण भोसले, संतोष नवले, संतोष कदम, सुभाष मोकळ, पुनीत सोनवणे, विक्रम मिटगे, कैलास थोरात, किरण गायकवाड, कैलास सांगळे, सुरेश खवले, संजय सरवार, उल्हास सरवार, नवनाथ सरवार यांच्यासह इतर पदाधिकारी व सर्व सभासद उपस्थित होते.लॉकडाउन वाढविण्यात आल्याने दोन्ही औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या बंद असून, बहुतांश कामगारांना लॉकडाउन काळातील पगारही कंपन्यांनी अद्याप दिलेला नाही. परिणामी अनेक कामगार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याशिवाय कंत्राटी कामगार, रोजंदारी करणारे मजूर,विडी कामगार, घर कामगारयासारखे घटकही अडचणीत सापडले असून, घरात अन्नधान्य नाही, खिशात पैसा नाही अशा परिस्थितीत दोनवेळच्या जेवणाची भ्रांत या घटकांपुढे आहे.कामगारांच्या हितासाठी सामाजिक कार्य करणाºया कामगार शक्ती फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या विदारकस्थितीत गरजू कामगार कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी फिरते झुणका-भाकर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. फाउण्डेशनच्या सभासदाने आपापल्या परिसरात सर्व्हे करून खºया अर्थाने गरजूंचा शोध घेऊन यादी तयार केली. त्यानुसार नियोजन करून या फिरत्या झुणका-भाकर केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक