शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेची सेवा करण्याचा ‘रोटरी’चा संकल्प

By admin | Updated: July 18, 2016 00:39 IST

पदग्रहण सोहळा : अध्यक्षपदी सुकेणकर

नाशिक : सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारी संस्था म्हणून रोटरी क्लब ओळखले जाते. २०१६-२०१७ वर्षासाठी ‘मानवतेची सेवा’ ही संकल्पना जागतिक स्तरावर घोषित करण्यात आली आहे. या संकल्पनेनुसार शहरासह जिल्ह्यात भरीव कामगिरी करणार असल्याचा संकल्प निवडण्यात नाशिक रोटरीच्या सभासदांनी सोडला.निमित्त होते, रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या पदग्रहण सोहळ्याचे. गंजमाळ येथील रोटरी सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळ्यामध्ये २०१६-१७ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष विवेक जायखेडकर यांच्याकडून अनिल सुकेणकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच उपाध्यक्षपदी विजय दिनानी, तर सचिवपदी राधेय येवले यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून साक्षरता अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मेहता, राजीव शर्मा, सौमित्र दास आदि मान्यवर उपस्थित होते.मानव सेवेचे ब्रीद यशस्वीपणे शहरासह जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न नाशिक रोटरी क्लबचा नेहमीच राहिला आहे. यापुढेही मानवसेवा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रोटरी बांधील असल्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल सुकेणकर यांनी यावेळी व्यक्त केला. सूत्रसंचालन डॉ. श्रेया कुलकर्णी, अ‍ॅड. मनीष चिंधडे यांनी केले. येवले यांनी आभार मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.