शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी रौंदळ, देवरे उपाध्यक्ष

By admin | Updated: August 10, 2015 23:00 IST

मजूर संघ : किमान एक वर्षाचा कालावधी मिळण्याची शक्यता

नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी रौंदळ व उपाध्यक्षपदी संगीता रवींद्र देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तूर्तास ही निवड नेमकी किती कार्यकाळासाठी हे स्पष्ट नसले तरी नूतन पदाधिकाऱ्यांना किमान वर्षभरासाठी कामकाज करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.काल (दि,१०) सायंकाळी ५ वाजता जिल्हा मजूर संघाच्या श्रम सहकार कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी शिवाजी रौंदळ यांनी, तर उपाध्यक्ष पदासाठी संगीता रवींद्र देवरे यांनी उमेदवारी अर्ज नेऊन वेळेत दाखल केले. शिवाजी रौंदळ यांच्या उमेदवारी अर्जासाठी सूचक संपतराव सकाळे, तर अनुमोदन केदा अहेर होते. तर संगीता देवरे यांच्या उमेदवारी अर्जास सूचक म्हणून दिलीप पाटील, तर अनुमोदक म्हणून आनंदा चौधरी होते. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झालेले असल्याने मतदान घेण्याची वेळ न येताच निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष पदी शिवाजी रौंदळ यांची, तर उपाध्यक्ष पदी संगीता रवींद्र देवरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी बैठकीस जिल्हा मजूर संघाचे संचालक जि. प. सभापती केदा अहेर, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले, जि. प. सदस्य संपतराव सकाळे, दिलीप पाटील, दिनकर उगले, संजय चव्हाण, राजाराम खेमनार, योगेश हिरे, गोरख शिंदे, म्हसू कापसे, योजना अहेर, अरुण गायकर, प्रमोद मुळाणे, संजय नाठे, शरद काळे, चंद्रलेखा मुरलीधर जाधव, योगेश पगार, आनंदा चौधरी, गणपत चौधरी आदि उपस्थित होते. यावेळी मजूर संघाच्या कार्यालयात मविप्र संचालक व जि. प. सदस्य रवींद्र देवरे, संजय बलकवडे, संदीप थेटे, प्रकाश शिंदे, महेश भामरे, मुरलीधर जाधव, दिलीप गायकवाड, विष्णुकांत गिते, रमेश पाटील, शांताराम मुळाणे, सागर सोनवणे, सचिव सुनील वारुंगसे, संजय बडवर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)