शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आज ठरणार एसटी संघटनेची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:57 IST

नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने वार्षिक १०७६ कोटींच्या प्रस्तावामध्ये वाढ करण्याऐवजी ती कमी करून वार्षिक ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने सदर प्रस्ताव एस.टी. कामगार संघटनेने फेटाळला आहे. यासंदर्भात शुक्रवार, दि. १९ रोजी मुंबईत होणाºया कृती समितीच्या बैठकीत पुढील रणनिती ठरणार असल्याने कृती समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देउच्चस्तरीय समितीच्या शिफारशी फेटाळल्याकृती समिती आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत

नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने वार्षिक १०७६ कोटींच्या प्रस्तावामध्ये वाढ करण्याऐवजी ती कमी करून वार्षिक ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने सदर प्रस्ताव एस.टी. कामगार संघटनेने फेटाळला आहे. यासंदर्भात शुक्रवार, दि. १९ रोजी मुंबईत होणाºया कृती समितीच्या बैठकीत पुढील रणनिती ठरणार असल्याने कृती समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वेतनवाढीच्या मुद्दावर एस.टी. कामगार संघटनेसह कृती समितीत सहभागी असणाºया संघटनांनी चार दिवसांचा संप पुकारला होता. या संपाला एस.टी. महामंडळाने न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने कामगार हिताचा मुद्दा उपस्थित करीत वेतनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समिती स्थापन होऊन समितीने वेतनवाढीचा मसुदा तयार केला आहे. वास्तविक यापूर्वी महामंडळाने १०७६ कोटींचा दिलेला प्रस्ताव नाकारून वेतनवाढीसाठी संप पुकारला होता. मात्र, उच्चस्तरीय समितीने त्यात आणखी कपात करून ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. संघटनेच्या राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत सदर प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. आता पुढील बैठक दि. १९ रोजी होत असून, त्यात होणारा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर नाराजी व्यक्त करताना संघटनेच्या वतीने सदर अहवाल निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने देऊ केलेले २.५७ च्या सूत्राऐवजी २.३७ चे सूत्र उच्चस्तरीयसमितीने दिले आहे. वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांऐवजी २ टक्के, घरभाडे १०टक्क्यांऐवजी ७ टक्के, २० टक्क्यांऐवजी १४ टक्के, ३० टक्क्यांऐवजी २१ टक्के केला आहे. या प्रस्तावामुळे कर्मचाºयांच्या एकूण वेतनात केवळ १०.५ टक्के इतकीच वाढ सुचविण्यात आली आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे पत्रक कामगार संघटनेने काढले आहे. निराशा करणारा अहवालशासकीय कर्मचाºयांप्रमाणे एस.टी. कर्मचाºयांचे वेतन होण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर संघटनेशी चर्चा न करता एकतर्फी वेतनवाढीचा प्रस्ताव दिला असून, ही वाढ अपेक्षित नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. कर्मचाºयांच्या हितासाठी वेतनाचा लढा सुरूच राहील.- विजय पवार, विभागीय अध्यक्ष,एस.टी. कामगार संघटना