शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’चे मजूर वळाले वैयक्तिक लाभाकडे !

By admin | Updated: July 8, 2017 01:04 IST

नाशिक : १९७२ मध्ये या योजनेची मुहूर्तमेढ केली, त्या रोजगार हमी योजनेचा मुख्य हेतूच अल्प मजुरीमुळे बाजूला पडत चालला आहे.

श्याम बागुल। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशाला दिशादर्शक ठरलेल्या राज्याच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे रूपांतर देशपातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत झाले असले तरी, ज्या कारणासाठी महाराष्ट्राने १९७२ मध्ये या योजनेची मुहूर्तमेढ केली, त्या रोजगार हमी योजनेचा मुख्य हेतूच अल्प मजुरीमुळे बाजूला पडत चालला असून, गावोगावच्या मजुरांनी ग्रामविकासाच्या सामूहिक कामांकडे काणाडोळा करीत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्येच आपले योगदान देत शासनाचा दुहेरी फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. हातांना काम व शहरी भागाकडे मजुरांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते, शेततळे, जमिनीचे सपाटीकरण, वृक्षलागवड, नालाबंधारा यांसारख्या गावपातळीवर सामूहिक गरजेची लाखो कामे आजवर केली गेली. ग्रामीण भागातील गोरगरीब बेरोजगारांना वरदान ठरलेल्या या योजनेच्या धर्तीवरच केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.या योजनेंतर्गत गाव पातळीवर वयाच्या अठरा वर्षांपुढील व्यक्तीला मजुरी करण्यायोग्य समजण्यात येऊन त्यासाठी नोंदणी व जॉब कार्ड देण्यात आले आहेत. ज्यांची मजूर म्हणून नोंदणी झाली आहे, त्यांना काम देणे शासनावर बंधनकारक असल्याने त्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर सामूहिक कामांना दरवर्षी मंजुरी दिली जात असली तरी या कामांची उपलब्धता व उपयोगितेचा विचार करता ती नाममात्र ठरू लागली आहेत. साधारणत: गेल्या तीन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे स्वरूप बदल ण्यास सुुरुवात झाली असून, ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करण्याबरोबरच, शहरी भागाकडे होणारे स्थलांतर टळण्यास मदत होण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, स्त्रीकर्ता असलेली कुटुंबे, शारीरिक विकलांग असेल्या व्यक्तींसाठी वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजना तळागाळापर्यंत तसेच खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांची उभारणी, पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई घरकुल, इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांची कामे करण्यासाठी ज्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, त्यांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच स्वत:च स्वत:च्या घराची उभारणी करायची; मात्र त्याची मजुरी शासनाकडून मिळणार आहे. अशा प्रकारे दुहेरी लाभ रोहयो मजुरांच्या पदरात पडू लागल्याने त्यांनी सार्वजनिक व सामूहिक रोजगार हमी योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमध्येच आपला सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे, परिणामी गाव पातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणारी रोजगार हमी योजनेची कामे कमी झाली आहेत.