समीर जमिल शेख व सिध्दांत धनेदर (रा.दोघे राजवाडा,देवळाली गाव) अशी हॉटेल व्यावसायिकास लुटणाऱ्या दोघा संशयिताचे नाव आहेत. याप्रकरणी बंटी कन्हैय्या दासवाणी (रा.सोमानी गार्डन समोर,एम.जी.रोड ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयितांपैकी सिध्दांत धनेदर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हॉटेल व्यावसायिक दासवाणी बुधवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास आपल्या वाहनातून हॉटेलच्या दिशेने प्रवास करीत असताना ही घटना घडली. खंडेराव मंदिराजवळ रस्त्यात अचानक उंट आल्याने दासवाणी यांनी आपल्या वाहनाचा हॉर्न वाजविला असता संशयितांनी त्यांना गाठून हॉर्न वाजविण्याचा जाब विचारला. यावेळी संतप्त दोघा संशयितांनी जवळ पडलेला दगड उचलून दासवाणी यांच्या डोक्यात मारला. दासवाणी जखमी झाल्याने संशयितांनी त्यांच्या खिशातील चार हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल काढून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.
भररस्त्यात व्यावसायिकाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST