शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

दरोडयाच्या तयारीतील टोळी जेरबंद

By admin | Updated: May 31, 2014 02:05 IST

दत्तनगर येथिल घटना : रिक्षासह शस्त्रास्त्रे जप्त

दत्तनगर येथिल घटना : रिक्षासह शस्त्रास्त्रे जप्तपंचवटी : पेठरोडवरील दत्तनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमाराला दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणार्‍या टोळीचा पंचवटी गुन्हा शोध शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असुन त्यांच्याकडून धारदार तलवार, दोरी तसेच रिक्षा असा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी शनिमंदीर येथिल दिपक कापुरे, राहूल पगारे, दिंडोरीरोडवरील राजेंद्र सोनवणे, व बोरगड येथे राहणारा अशोक भालेराव अशा चौघांना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे पावणेतीन वाजता पंचवटी गुन्हा शोध पथकाचे पोलीस कर्मचारी दत्तनगर विटभ˜ीजवळ गस्त घालत असतांना रिक्षा क्रमांक (एम. एच. १५ झेड ९७५९) ही संशयास्पद रित्या उभी होती. पोलीसांनी रिक्षात बसलेल्या चौघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यातील दोघा जणांनी पळ काढला. पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांचा पाठलाग करून पकडले व रिक्षाची झडती घेतली असता रिक्षात दोरी तसेच धारदार तलवार मिळून आली पोलीसांनी लागलीच चौघांनाही पोलीस ठाण्यात आणून कसुन चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्याच्या इराद्याने दत्तनगर भागात थांबलेले असल्याची कबुली दिल्याचे पोलीसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विजय गवांदे, भगिरथ नाईक, येवाजी महाले, विजय वरंदळ, कोकाटे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (वार्ताहर)