शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून लुटणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST

इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कैलासनगर परिसरात भरदिवसा घरफोडी आणि घरात शिरून बालकाच्या गळ्याला ...

इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कैलासनगर परिसरात भरदिवसा घरफोडी आणि घरात शिरून बालकाच्या गळ्याला चाकू लावून आईच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लुटणारा‌ संशयित आरोपी तडीपार गुन्हेगार करण कडुसकर याला अटक करण्यात येऊन त्याच्याकडून ४३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाम स्क्वेअर बिल्डिंग, कैलासनगर याठिकाणी दोन दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी या बिल्डिंगमधील दोन बंद घरांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून त्यातील एका घरातून सोन्याचे व चांदीचे एकूण १५ हजारांचे दागिने लंपास केले होते. तसेच त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तींनी बिल्डिंगच्या वाहनतळामधील खोलीत राहत असलेल्या वॉचमनच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून वॉचमनच्या पत्‍नीला चाकूचा धाक दाखवून तिच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, रोख दहा हजार रुपये, एक मोबाईल असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटून घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींवरून पळ काढला होता.

फिर्यादीला यादीवरील गुन्हेगारांचा छायाचित्राचा अल्बम दाखवला असता, अंबड पोलीस ठाण्यातील यादीवरील तडीपार गुन्हेगार ऋषिकेश कांबळे (१९, घरकुल योजना, चुंचाळे) याला ओळखले. हा संशयित आरोपी घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानाचे शटर तोडून पळून जात असताना घोटी पोलिसांनी पकडून त्याला अटक केली होती. दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता, हद्दपार गुन्हेगार करण कडुसकर (२०, रा. अंबड) याच्यासह इतर दोन साथीदारांची खोटी नावे सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनिरीक्षक जाकीर शेख, शरद आहेर, प्रभाकर पवार, दत्तात्रय गवारे आदींनी सापळा रचून तडीपार गुन्हेगार करण कडुसकर याला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी, हत्यार, घड्याळ, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कपडे असा एकूण ४३ हजार पन्नास रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.