शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

तिसगाव शिवारात पेट्रोलपंपावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:30 IST

वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील तिसगाव फाट्यावरील पेट्रोलपंपावर चार अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवुन लुट केल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील तिसगाव फाट्यावरील पेट्रोलपंपावर चार अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवुन लुट केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तिसगाव शिवारातील साई गजानन पेट्रोलपंपलगतच्या कॅबीनजवळ दोन मोटरसायकलवर चार अज्ञात संशयित आले. त्यांनी केबिनची काच फोडत आत प्रवेश केला. तेथे पेट्रोलपंपावरील कर्मचारी झोपलेले होते. मात्र काच फोडण्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. त्या अज्ञात चौघांनी पेट्रोलपंपावरील दोन कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी केली. शिवाय कर्मचाऱ्यांना मारहाण करत कोयत्याचा धाक दाखविला व जीवे मारण्याची धमकी दिली. जीव वाचविण्याच्या भितीने या दोन कर्मचाºयांनी सोळा हजार पाचशे रु पये असलेली छोटी बॅग संशयितांच्या हवाली केली. पैेस हातात येताच लुटारु ंनी घटनास्थळावरु न पळ काढला. कर्मचार्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पेट्रोलपंप मालकाला दिली. सदर घटना तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व पेट्रोलपंप परिसराची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर शिंपी स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.----------------------सीसीटीव्हीत घटना कैदपोलिसांनी सिसिटिव्ही फुटेजची पाहणी केली असता लूटीचा प्रकार कैद झाला आहे. मात्र रात्रीची वेळ व लाईट बंद असल्याने अंधुक प्रकाशात संशयितांची ओळख पटविता आली नाही. तोंड कपड्याने झाकलेले असल्यामुळे केवळ शरीयष्टी देहबोली व लुटमारीची पद्धत यावरु न तपास सुरु आहे. या पेट्रोलपंपावर जबरी लुट केल्याप्रकरणी २५ ते ३० वयोगट असणार्या संशयीतांनी ही लुट केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. देवीदास संपत चतुर या कर्मचार्याने याबाबत फिर्याद दिल्याने चौघा संशयितांविरोधात शस्त्राचा धाक दाखवुन जबरी लुट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक