शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST

या जबरी चोरीप्रकरणी पंचवटीतील विजयनगर कॉलनी येथे राहणाऱ्या ब्रज अक्षय शहा याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

या जबरी चोरीप्रकरणी पंचवटीतील विजयनगर कॉलनी येथे राहणाऱ्या ब्रज अक्षय शहा याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ब्रज शहा मित्र मित माजेठिया आणि सिद्धांत शर्मा असे पेठरोडवर चांभार लेणी येथे फिरण्यासाठी गेले होते. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मित्र चामारलेणी पायथ्याशी लोखंडी शेड जवळ फोटो काढत असताना, उंचीने कमी असलेला गळ्यात हस्तिदंतासारखे ताईत घातलेला एक संशयित आला व त्याने पिस्तूल दाखविले. त्यानंतर, त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने शहा आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ, मारहाण करत शहा व त्याच्या मित्रांच्या अंगावरील हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणेदोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किमतीचे एकूण पाच आयफोन, तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले, तर घटना घडल्यानंतर घाबरलेल्या युवकांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाणे गाठत झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पाहणी करून संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हा शाखेच्या पोलिसांना आदेश दिले आहेत.