शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूलचा धाक दाखवून लुटणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील चामरलेणी येथे फिरायला गेलेल्या पंचवटीतील चौघा जॉगर्सला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे ...

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील चामरलेणी येथे फिरायला गेलेल्या पंचवटीतील चौघा जॉगर्सला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने, पाच मोबाईल असा सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेणाऱ्या टोळीचा म्हसरूळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावून बेड्या ठोकल्या..

दोन दिवसांपूर्वी नवीन आडगाव नाका विजयनगर कॉलनीत राहणारा फिर्यादी ब्रज अक्षय शहा व त्याचे अन्य तीन मित्र रविवारी दुपारी चामरलेणी येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथे डोंगराच्या पायथ्याशी फोटोसेशन करत असताना तेथे संशयित लुटारूंची टोळी आली. टोळीतील एकाने हस्तीदंताचे गळ्यात लॉकेट घातलेल्या गुन्हेगाराने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील ब्रेसलेट तसेच पाच आयफोन व पंधराशे रुपये रोख असा २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ गुन्हे शोध पथकाला संशयितांचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या.

त्यानंतर काही वेळाने ढोकणे यांना गुप्त बातमीदारामार्फत लूट करणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली. तसेच घटनास्थळी पोलिसांना हॉटेलातून आणलेल्या जेवणाच्या पार्सलच्या बांधणीचे वेष्टणही (रॅपर) मिळाले. त्यावरून पोलिसांनी त्या हॉटेलचा शोध घेतला. हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका संशयिताचे वर्णन मिळाले. पोलिसांनी पाळत ठेवून त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला. मात्र, त्यास संशय आल्याने तो घराजवळून निसटून गेला. त्यावरून या गुन्ह्यातील संशयित निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित संदीप सुधाकर पगारे, आनंद रघुनाथ जाधव (दोघे रा. फुलेनगर) सुनील गायकवाड (रा. औरंगाबादरोड), रवी कचरू निकम (रा.ओमनगर, मेहरधाम) यांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. माळी, गणेश रेहरे, मयूर पवार, संजय पवार यांच्या पथकाला या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

इन्फो बॉक्स

खंडणीच्या गुन्ह्यातील फिर्यादी निघाला संशयित आरोपी

जबरी चोरीच्या प्रकरणात म्हसरूळ पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांपैकी संदीप पगारे हा पंचवटी पोलिसांकडे दाखल असलेल्या एका खंडणी वसुलीच्या गुन्ह्यातील फिर्यादी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पगारे हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले.

याने आपण भाजीपाला विक्री व्यवसाय करीत असून व्यवसाय करण्यासाठी संशयित विशाल भालेराव व त्याच्या साथीदारांनी पन्नास हजार रुपये खंडणी मागितली अशी तक्रार काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन दिली होती. आता त्याने दिलेली तक्रार खरी की खोटी याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.