ंमालेगाव : तालुक्यातील झोडगे येथे अनिता नरेश गवांदे (२७) या महिलेचा स्टोव्हच्या भडक्याने गंभीररीत्या भाजल्याने नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनिता गवांदे ही २० जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात स्वयंपाक करीत असताना स्टोव्हच्या भडक्याने ५० टक्के भाजून जखमी झाली होती. तिला उपचारार्थ नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नजन करीत आहेत.
झोडगेत महिलेचा भाजून मृत्यू
By admin | Updated: August 6, 2014 00:40 IST