शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते

By admin | Updated: September 2, 2014 01:13 IST

रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते

 

मालेगाव : शहरातील सर्व रस्त्यांवर विशेषत: गणेश मिरवणूक मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, संबंधितांनी खड्डे बुजवावे, अशी मागणी मालेगाव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष राम गवळी यांनी केली आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे गणेशभक्तांना गणेश स्थापनेसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, पाचकंदील, शनि चौक, रामसेतू पूल, संगमेश्वर, मोतीबाग नाका, जुना आग्रा महामार्ग, कॅम्प रस्ता, सटाणा रस्ता, सोयगाव आदि भागातील सर्वच चौक व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रहिवाशांना, वाटसरुंना तसेच वाहनचालकांना त्याचा अंदाज न आल्याने ते त्यात जाऊन अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच या खड्ड्यातील पाणी उडाल्याने रोजच बाचाबाची व हाणामारीच्या घटना घडत आहेत. शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असूनही महानगरपालिका त्याकडे काणाडोळा करत आहेत. महापालिका शहरातील रस्त्यांवर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दाखवीत असूनही शहरातील रस्ते सुधारत नाही हे विशेष. शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते इतकी दयनीय परिस्थिती येथील रस्त्यांची आहे. मनपातर्फे तयार करण्यात येणारा एकही रस्ता महिनाभरापेक्षा जास्त दिवस टिकत नसल्याचे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरून अनेकवेळा उघडकीस आले आहे. शहरातील मोसमपूल ते कॅम्प रस्त्यावर एक कोटी रुपयाचा खर्च केल्याचे कागदोपत्री असूनही महापालिका अस्तित्वात आल्यापासून हा रस्ता खड्डेमुक्त झालेला नाही. शहरवासीय रस्त्यांमुळे त्रस्त असतानाही नगरसेवक त्याविरोधात आवाज उठवित नाहीत. या रस्त्याची करण्यात येणारी डागडुजी काही तासातच उखडण्यात सुरुवात होते. असे असतानाही याची कोणतीही चौकशी सरकार दरबारी का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांची गुणवत्तापूर्ण डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेश उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.