शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरीतील रस्त्यांची मुसळधार पावसामुळे दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST

या रस्त्यावरील चिखल चाकावरील गार्डमध्ये अडकल्याने अनेक चालकांना गाडीचे मडगार्ड खोलून हातात घेऊन जाण्याची वेळ येत असते. अनेक दुचाकीस्वारांना ...

या रस्त्यावरील चिखल चाकावरील गार्डमध्ये अडकल्याने अनेक चालकांना गाडीचे मडगार्ड खोलून हातात घेऊन जाण्याची वेळ येत असते. अनेक दुचाकीस्वारांना दुचाकी घसरण्याच्या भीतीने पाच ते सात किमी जास्त अंतराच्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे.

हनुमाननगर (मानोरी) येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामासाठी जाण्यासाठी तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी हा मुख्य रस्ता आहे, आणि त्याकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामस्थांना येवला येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, बाजार समिती अशा महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी ह्या रस्त्याची जास्तच प्रमाणात गरज भासत असते. लासलगाव-शिर्डी महामार्गावर जाण्यासाठीदेखील हा मुख्य रस्ता असून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संबंधित विभागाने तत्काळ सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, येथील मानोरी बु. ते खडकीमाळ या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत. वाहनचालकांना साचलेल्या खड्ड्याच्या पाण्यातून रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. मुखेड फाटा येथे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून या मुख्य रस्त्याची अवस्था पावसाळ्यात शेतशिवारातील मातीच्या रस्त्यासारखी झाली आहे. या मानोरी बु. ते खडकीमाळ रस्त्याचे देखील तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दिवसेंदिवस अवस्था खूप वाईट होत चालली असून, त्या रस्त्यांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावावे.

- नंदाराम शेळके, सरपंच, मानोरी बुद्रुक. (०८ मानोरी)

080921\08nsk_27_08092021_13.jpg

मानोरीतील रस्त्यांची मुसळधार पावसामुळे दुदर्शा