कळवण-कळवण शहरांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नामपूर ,सटाणा-कळवण ,वणी रस्ता राज्यमार्ग २०या मेनरोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्यांचीवाट लागली आहे. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्यावरील खड्ड्यातूनच नित्याने प्रवास करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवणकर जनतेवर आली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवीत वाहनचालकांना वाटचाल करावी लागत असल्याने कळवण शहरातून जायंच तर जरा सांभाळून रस्त्यावर फार खड्डे झाले आहे अशी म्हणण्याची वेळ कळवणकरांवर आली आहे.त्यामुळे खड्डे मुक्त कळवण तालुक्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम विभागाने धाब्यावर बसवली आहे.तर या रस्त्याची सुधारणा होणार तरी कधी ? असा संतप्त सवाल कळवणकर जनतेने केला आहे.शहरातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता हा मेनरोड म्हणून ओळखला जातो. शहरातील जनतेची नाळ जोडलेला ‘मेनरोड’ आज सार्वजनिक बांधकाम विभागामुळे अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. रस्त्याला ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण व साचलेली धूळ , तुंबलेल्या आ िणबंदीस्त गटारी यामुळे मेनरोडच्या रस्त्याची अक्षरश: ‘वाट’ लागल्याने या रस्त्यांच्या विकासकामाकडे लोकप्रतिनिधीपासून शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी दि २० डिसेंबर२०१६रोजी गणेशनगर भागात या रस्त्याच्या सुधारणा कामाचे मोठ्या दिमागात आमदार जे पी गावीत यांच्याहस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमिपूजनाचा कार्यक्र म केला. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्यावरील खड्ड्यातूनच नित्याने प्रवास करण्याची वेळ कळवणकर जनतेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आणली आहे.रस्त्याच्या दुरावस्थामुळे छोटी मोठी अपघाताबरोबर रस्त्याच्या बाजूला शाळा , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून या रस्त्यावरून दररोज हजारो विद्यार्थी ,विद्यार्थीनी व पादचारी अक्षरशा जीव मुठीत घेऊन वाटचाल करतात. रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक असल्याने कळवण शहरात येणारी व जाणारी वाहने याच रस्त्यावरून जात असल्याने सर्वांच्या दृष्टीने हा रस्ता महत्वपूर्ण आहे .त्यामुळे या रस्त्याचे महत्व लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कळवण शहरातील विविध राजकीय पक्ष पदाधिकारी व सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी या रस्त्याची सुधारणा करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली मात्र त्या मागणीकडे देखील दुर्लक्ष केले गेले.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे --रस्त्यावर पडणारे पाणी , सांडपाणी वाहून नेणार्या गटारी अिस्तत्वात नसल्याने पाणी तुंबून रहाते. त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत असून साथीचे रोग पसरतात.रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्याने सतत वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयाला रस्त्याची दुरु स्ती करावी असे गरजेचे वाटत नाही का ? अशी भावना सर्वसामान्य जनतेची झाली आहे. रस्ते दुरु स्तीच्या नावाखाली मलमपट्टी करून रस्त्याची डागडुजी केली गेली. मात्र ती उपाययोजना कायमस्वरूपी टिकणारी नसल्याने रस्त्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या रस्त्याची सुधारणा करणे गरजेचे आहे असे मत कळवणकर जनतेने व्यक्त केले आहे.चौकटीत घ्या-रस्त्यासाठी प्रयत्न करा-रस्त्यावर छोटी मोठी खड्डे पडल्याने रस्ता धोक्याचा झाला आहे. पादचारी ,शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेवून चालतात.या रस्त्यावर पडणार्या पाण्याचा निचरा करणारी गटार यंत्रणाच अिस्तत्वात नसल्याने रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य आण िरस्ता चढ उताराचा व खराब होणे हा नित्यनियम झाला आहे .या रस्त्यावरील प्रवासामुळे पाठीचे मणके मोकळे होत असल्याने रस्त्यांची वाट बिकट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेतत्काळ उपाययोजना करु न रस्त्यांची सुधारणा करावी -- मयुर बहीरम- नगराध्यक्ष कळवण नगरपंचायतमेनरोड या रस्त्यांवरील खड्ड्यांना लोकप्रतिनिधीचे राजकारण प्रामुख्याने कारणीभूत असून मेनरोडसाठी मंजूर झालेला कोट्यवधी रु पयांचा निधी परत गेला. मेनरोडचे काम देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने रद्द केले.नगरपंचायतने आपल्या अखत्यारीत असलेले रस्त्यावर काँक्रि टीकरण केल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांची समस्या सुटली. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असलेल्या मेनरोडची दुरावस्था ही कळवणकरांना मोठी डोकेदुखी ठरली आहे.- पंकज पाचिपंडउपाध्यक्ष नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसरस्त्याबाबत आता प्रश्नचिन्ह ?कळवण नगरपंचायत हद्दीतून जाणारा आण िसार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांच्या अखत्यारीत असलेल्या नामपूर सटाणा-कळवण वणी रस्ता राज्यमार्ग २०(कळवण शहर अंतर्गत ) रस्त्याची सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने १कोटी २५लाख रु पयांची प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर केल्यानंतर त्याची निविदा काढण्यात आली. या कामासंदर्भात निविदा प्रक्रि या लांबवली गेल्याने खूप वेळ गेला.ही निविदा प्रक्रि या सुरु असताना हायब्रीड अॅन्युईटी योजनेत या रस्त्याचा समावेश झाला असल्याने आता या रस्त्याची पुन्हा निविदा व खर्च शासन करणार नसल्याचे एका अधिकारीने सांगितले.बांधकाम विभागाची दिरंगाई -केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात हायब्रीड अॅन्युईटी योजना डिसेंबर २०१७पासून सुरू करण्यात आली असून त्यात नामपूर सटाणा कळवण वणी पिंपळगाव बसवंत निफाड सिन्नर हा ३२० कोटी रु पयांच्या कामाचा समावेश करण्यात आला . कळवण शहरातून हा रस्ता जाणार असून त्याची निविदा प्रक्रि या पूर्ण होऊन ठेकेदार निश्चित करण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे केवळ कळवण शहरातील या रस्त्यावर मंजूर असलेला निधी खर्च करण्यासाठी शासनस्तरावरु न सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश मिळतील का ? याबाबत एका अधिकारीने शंका उपस्थित करु न दिरंगाईबाबत सहमती दर्शवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे कळवणकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.(२०कळवणरस्ता)
कळवण शहरात खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 16:16 IST
कळवण- कळवण शहरांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नामपूर ,सटाणा-कळवण ,वणी रस्ता राज्यमार्ग २०या मेनरोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्यांचीवाट लागली आहे. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्यावरील खड्ड्यातूनच नित्याने प्रवास करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवणकर जनतेवर आली आहे.
कळवण शहरात खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची लागली वाट
ठळक मुद्दे सुधारणा होणार तरी कधी ? :कळवणकरांचा संतप्त सवाल