शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला जागोजागी रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:05 IST

चांदवड : शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची बातमी कळताच प्रशासन जागे झाले असून, गावासह शहराकडे येणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाच किलोमीटरचा परिसर हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला

चांदवड : शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची बातमी कळताच प्रशासन जागे झाले असून, गावासह शहराकडे येणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत.बुधवारी (दि. ८) नागरिकांनी बाजारात सोशल डिस्टसिंग न पाळल्याच्या कारणावरून पोलिसांनी भाजीपाला विक्री व किराणा दुकाने पूर्णपणे बंद करून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात शहरात कोरोनाचा रुग्ण मिळून आल्याने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.चांदवड शहरात येणारे सर्व मार्ग शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर सील करण्यात आली आहेत. दवाखाने व मेडिकल स्टोअर्सवगळता कोणतेही दुकाने सुरू राहणार नाही.तालुक्यातील अनेक गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरील व्यक्ती गावात येणार नाही किंवा गावातील कोणतीहीव्यक्ती बाहेर जाणार नाही, यासाठी तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, सरपंच आशासेविका, अंगणवाडी सेविका प्रयत्नशील आहेत.पाच किलोमीटरचा परिसर हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बफर झोनमधील गावांमध्येसुद्धा कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. घराघरी जाऊन आरोग्य विभागाचे सर्वेक्षण संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या वतीने सर्वच मुख्य रस्त्यांवर जंतुनाशक फवारणी सुरू आहे. घराघरी जाऊन आशा सेवक, आरोग्य सेविकांच्या पथकाने सर्वेक्षण करावे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे यांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याroad safetyरस्ते सुरक्षा