शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

जिल्हा परिषदेच्या रस्ते दुरुस्तीची ‘वाट’ बिकट

By admin | Updated: December 22, 2015 23:27 IST

सहा कोटींचा प्रस्ताव : तीन महिने उलटूनही प्रस्ताव पडून

नाशिक : ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी दरवर्षी मंजूर करण्यात येणारा रस्ता देखभाल दुरुस्तीचा कार्यक्रम डिसेंबर उलटत आला तरी मंजूर न झाल्याने जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त रस्त्यांची वाट आणखी बिकट होणार असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एक, दोन व तीन मिळून सुमारे सहा कोटी १४ लाखांचा रस्ते देखभाल व दुरुस्तीचा कार्यक्रम सन २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मुळातच हा प्रस्ताव एप्रिल-मे २०१५ मध्ये शासन स्तरावर पाठविणे आवश्यक असताना प्रत्यक्षात सप्टेंबर उजाडल्यानंतर हा प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.तत्पूर्वी शासन स्तरावरून जिल्हा परिषदेला हा रस्ते देखभाल दुरुस्तीच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव वेळेत न पाठविल्यामुळे स्मरणपत्र पाठवून कान उघडणीही करण्यात आली होती. त्यानंतर उशिराने जाग आलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने साधारणत: प्रत्येक गटात आठ लाखांच्या रस्ते दुरुस्तीची कामे प्रस्तावित करीत सुमारे सहा कोटी १४ लाखांचा रस्ते देखभाल व दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला पाठविला आहे. आता डिसेंबर संपत आला तरी जिल्हा परिषदेच्या रस्ते देखभाल व दुरुस्तीच्या प्रस्तावांना अद्याप शासन स्तरावरून मान्यता मिळालेली नाही. केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदेच्या रस्ते देखभाल व दुरुस्तीच्या कार्यक्रमास मान्यता मिळाली नसल्याचे वृत्त आहे. मुळातच राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केल्याने यावर्षी रस्ते देखभाल व दुरुस्तीच्या कामांना कात्री लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्णातील गामीण भागातील खड्डे व खाचखळगे असलेल्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या नशिबी दुरुस्तीसाठी प्रतीक्षा आली आहे. (प्रतिनिधी)