शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक देवाणघेवाणवरून रखडले रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST

महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २४ मधील नगरसेवकांच्या निधीतून सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून बडदेनगर ते पाटीलनगर रस्ता डांबरीकरण ...

महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २४ मधील नगरसेवकांच्या निधीतून सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून बडदेनगर ते पाटीलनगर रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाला मागील वर्षी सुरुवात केली होती. प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे यांच्या नगरसेवक निधीतून हे काम सुरू करण्यात आले आहे. अर्धा रस्ता झाल्यानंतर एका शेतकऱ्याने हरकत घेतली असून, त्याला मोबदला देण्यावरून स्थायी समितीत विषय पटलावर आल्यानंतर सदरचा विषय हा आर्थिक देवाणघेवाणीवरून अडल्याचे बोलले जात आहे. बडदेनगर ते पाटीलनगरचा रस्ता झाल्यानंतर कामगारांना या रस्त्याने अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता होणार आहे. तसेच सिडको भागातील नागरिकांनादेखील या रस्त्याने ये-जा करणे सोपे होणार असल्याने हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

चौकट

बडदेनगर ते पाटीलनगर दरम्यानचा रस्ता हा शेतकऱ्यांना मोबदला देण्यावरून रखडला असून, अ‌र्धवट झालेल्या रस्त्याचा फायदा मद्यपी घेत आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या रस्त्यालगत मद्यपींचा वावर वाढला असून, सदरचा रस्ता हा मद्यपींचा अड्डा झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भी‌तीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नागरिक फिरायवास जाताना या रस्त्याच्या कडेला मद्याच्या बाटल्यादेखील पडलेल्या असल्याचे दिसून आले. यामुळे या ठिकाणी रा‌त्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चौकट.....

बडदेनगर ते पाटीलनगर रस्ता हा केवळ आर्थिक देवाणघेवाणवरून रखडला असल्याचे बोलले जात असून, मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फोटो

०८रस्ता फोटो