शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:06 IST

महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

नाशिक : महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.  ‘जागर युवा संवादाचा’ कार्यक्रमानिमित्त मविप्र संस्थेच्या अ‍ॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्र संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे उपस्थित होते. जीएसटी, कर्जमाफी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी धोरणांविषयी त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. खासदार सुळे म्हणाल्या की, कोणत्याही देशात २८ टक्के कर दिला जात नाही. जीएसटी लागू करण्यापूर्वी करदात्यांना साधारणत: वर्षभर अवधी देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आम्ही केली होती.  मात्र, निर्णय घेताना परिणामांची मिमांसा न करणाºया सरकाराने आता यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. कर्जमाफीचा अर्ज चुकला की फौजदारी, व्यावसायिकांनी जीएसटी नाही भरला की फौजदारी करायची. त्यामुळे या सकारला काम करण्यापेक्षा फौजदारी करण्यामध्ये फार रस असल्याचा टोलाही त्यांनी  लगावला.  सरकार योग्य निर्णय घेते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. निवडणूक निकालांच्या वातावरणातून बाहेर पडून या सरकारने आता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकरी-व्यापाºयांशी चर्चा करून त्यांना जाणवणाºया समस्यांवर वेळीच तोडगा काढवा. केवळ सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास भविष्यात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही खासदार सुळे यांनी याप्रसंगी दिला.शिवसेना-भाजपाचे भांडण व्हेरी फनीराज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना व भाजपामधील संबंध अत्यंत टोकाला पोहोचल्याबाबत त्यांना विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या, सकाळी भांडायचे आणि सायंकाळी सोबत चहा प्यायचा. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या भांडणाकडे आता फारसे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांचे मतभेद म्हणजे आता व्हेरी फनी वाटत असल्याने मीदेखील यावर भाष्य करणे आता सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले.अशोक चव्हाण बाजीगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठा राखून प्रचार केल्यामुळे नांदेडच्या नागरिकांनी त्यांच्यावर संपूर्ण विश्वास दाखविला. या निवडणुकीत शिवसेना, भाजपाने अत्यंत खालच्या थरावर प्रचार केला. राज्यात इतक्या खालच्या थरावर प्रचार कधी पोहोचला नव्हता. राजकीय प्रचाराची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याबाबत खेद वाटत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.