शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

वडझिरेतील रस्ते बनले मृत्यूचे सापळे

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

वडझिरेतील रस्ते बनले मृत्यूचे सापळे

 

वडझिरे: तालुक्यातील वडझिरे परिसरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून हे रस्ते जणू मृत्यूचे सापळे बनले आहेत. या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.तालुक्याच्या नैऋत्य कोपऱ्यात असलेल्या वडझिरे गावाला जोडले जाणारे सर्वच रस्ते प्रचंड खराब झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या रस्त्यांची कामे झाली होती मात्र अल्पावधीतच त्यांची वाट लागली आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरून अपघांचे प्रमाण वाढले आहेत. सिन्नर- वडझिरे हा रस्ता माळेगाव एमआयडीसी मार्गे जातो. पुढे ब्राम्हणवाडे मार्गे शिंदे येथे नाशिक - पुणे महामार्गाला जाऊन मिळतो. त्यामुळे नाशिक- पुणे महामार्गावर अपघात झाल्यास अथवा वाहतूक कोंडी झाल्यास या महामार्गावरील वाहतूक या रस्त्याने वळविली जाते. मात्र रस्ता खराब असल्याने मोठी वाहने जाऊ शकत नाही. गावाच्या परिसरात जे.व्ही.एस. नामक कारखाना सुरु झाला आहे. तसेच या भागात अनेक खडी क्रशर असल्याने या मार्गावरुन अनेक अवजड वाहने धावू लागली आहेत. या रस्त्याची वाहतूक क्षमता केवळ १० टनाची असून त्यावरुन सुमारे ३० ते ४० टनाचा बोजा वाहनारे शेकडो अवजड वाहने सध्या या रस्त्याने वाहतूक करीत आहेत. परिणामी वजनामुळे हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या खोल गेल्या आहेत. परिणामी त्यावर दुचाकी चालक घसरून गेल्या काही दिवसांता अनेक अपघात झाले असून अनेकांना दुखापतींना सामोरे जावे लागले आहेत. निवेदनावर सरपंच लता बोडके, उपसरपंच फकिरा दराडे, सुनील ठोंबरे, विलास बोडके, वसंत बोडके, अर्जुन बोडके, भास्कर गिते, आर. बी. बोडके, संजय बोडके, तुळशीराम ठोंबरे, शिवाजी बोडके आदींची नावे आहेत. (वार्ताहर)