शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड टोलनाक्यावर रस्ता सुरक्षा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:14 IST

चांदवड : मंगरूळ य्ेथील इरकॉन सोमा टोलवेज पथकर टोलनाक्यावर दि. २३ एप्रिल ते दि. ७ मे या कालावधीत २९ व्या रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देवाहनाचा विमा कागदपत्रे स्वत:जवळ बाळगावी नवीन वाहनांची नोंदणी करून विमा काढावा

चांदवड : मंगरूळ य्ेथील इरकॉन सोमा टोलवेज पथकर टोलनाक्यावर दि. २३ एप्रिल ते दि. ७ मे या कालावधीत २९ व्या रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मोहिते यांनी वाहनांचे अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे तर नशेत वाहने चालवून स्वत:च्या व इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये तर वाहनचालकांनी कागदपत्रे, वाहनपरवाना, वाहनाचा विमा कागदपत्रे स्वत:जवळ बाळगावी, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, अतिरिक्त भार असलेली वाहने चालवू नयेत. प्रवासी वाहतूक ठरवून दिलेल्या नियमानुसार करावी, रात्रीच्या वेळी वाहने स्पष्ट दिसावी म्हणून वाहनांना रिफ्लेक्टर लावावेत, शाळा, महाविद्यालये, दवाखाने यांच्यासमोरून वाहने नेताना हॉर्न वाजवू नये तर नवीन वाहनांची नोंदणी करून विमा काढावा आदी सूचना मोहिते यांनी दिल्यात. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, उपनिरीक्षक रामचंद्र जगताप, वाहतूक शाखेचे पोलीस मुज्जमिल देशमुख, योगेश हेबांडे, आर.बी. बिन्नर , अमित सानप, चंद्रकांत निकम, नरेंद्र सौंदाणे, सागर शेवाळे, मंगेश डोंगरे, आयएसटीपीएल व्यवस्थापक के. व्ही. सुरेश, प्लाझा मॅनेजर पंकज झवर, अपघात विभागप्रमुख रामेश्वर भावसार, भाऊसाहेब धाकराव, टोल प्लाझाचे सहायक व्यवस्थापक सुहास कापडणी, प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होेते.यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे बसचालक, वाहक, वाहनचालकांना पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद्र जगताप व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत केले तर नियमांच्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. तर वाहनांवर रिफ्लेक्टर लावून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे यांनी केले. तर स्वागत सुहास कापडणी यांनी केले. या सप्ताह कालावधीत चांदवड टोल प्लाझावर विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले.