मनमाड : नाशिक येथे निघणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चात सहभागी होण्यासाठी मनमाड शहरासह परिसरातून हजारो समाजबांधव रवाना झाले. खासगी गाड्या, रेल्वे तसेच एसटी बस मिळेल त्या वाहनांचा आधार घेऊन समाजबांधवांनी नाशिक गाठले.नाशिक येथील महामोर्चाला जाण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव आधीपासूनच तयारी करत होते. शहरातील सर्व समाजबांधव स्टेडिअमवर जमा झाले. या ठिकाणी सर्वांना नास्ता पॅकेट्स व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ समाजबांधवांच्या हस्ते पूजन करून सर्व वाहने रांगेने शिस्तीत नाशिककडे रवाना झाली. येथील मालेगाव चौफुली, निमोण चौफुलीवर नाशिक येथे जाणाऱ्या समाजबांधवांची गर्दी दिसून येत होती. ग्रामीण भागातून पिकअप, टेम्पो तसेच अन्य वाहनांनी समाजबांधव मोर्चासाठी रवाना झाले. नांदूर नाका येथे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आाली होती. मोर्चानिमित्त मनमाड बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. शहरातील अनेक संस्था व दुकाने बंद असल्याने शुकशुकाट जाणवत होता. मनमाड शहरासह परिसरातून पंचवीस ते तीस हजार समाजबांधव मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
रस्ते गर्दीने फुलले
By admin | Updated: September 24, 2016 23:10 IST