शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भोरटे शिवारात जाणारा रस्ता रहदारीसाठी बंद

By admin | Updated: March 26, 2017 22:58 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला असून, केबल टाकण्यासाठी खोदलेली चारी ठेकेदाराने न बुजविल्याचा हा परिणाम असल्याचे कळते. त्यावेळेस भोरटे शिवारात जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला फोरजी केबल टाकण्यासाठी खोलवर चारी करण्यात आली. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची चारी बुजवली नसल्याने या शिवारातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर काढता येत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारास सदर रस्त्यावरील चारी बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी केली असता संबंधित ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. नवी बेज येथील गिरणा नदीकाठालगतच्या भोरटे शिवारात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी असून, या शिवारातील सर्व शेती बारमाही बागायती असल्याने या शिवारातील शेतकऱ्यांचा हा पूर्वीपासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे. आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोलवर चारी असून, मोठ्या प्रमाणात खडीचे ढीग असल्याने या रस्त्यावरून फक्त पायवाटेएवढी जागा येण्या-जाण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांचा गहू, कांदा, हरभरा काढणीवर आला असून, या परिसरात गहू काढणीसाठी हार्वेस्टर यंत्र, ट्रॅक्टर, गाडीबैल जाण्यासाठीचा पूर्वीपासून असलेला हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, संबंधितांकडून शेतकऱ्यांचा हा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस सुरळीत करून मिळावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार, पोपटराव पवार, दिलीप देशमुख, जिभाऊ बच्छाव, दगा पवार, अतुल पवार, हरिदास बागुल, महेंद्र देवरे या शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरतसध्या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल काढणीवर आला असून, रस्त्यावर चारी केलेली असल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. शेतकऱ्यांनी सदर रस्ता सुरळीत करून मिळावा यासाठी संबंधित ठेकेदारास सांगूनही ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा काढलेला शेतमाल शेतात पडून आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे सदर रस्ता कधी सुरळीत करून मिळणार याकडे लक्ष लागून आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता तालुका प्रशासन याकडे किती गांभीर्यपूर्वक पाहते व काय भूमिका घेते याकडे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.