सटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील दळवळण विकसित करण्याच्या दृष्टीने शासनाने साडेतीन कोटी रु पये खर्चून गणपती घाट रस्त्याचे काम केले; मात्र गटारींचा अभाव आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. रस्ता खचल्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहतूक वारंवार ठप्प होऊन आदिवासी भागाचा संपर्क तुटून दळवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.बागलाण तालुक्याच्या पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील दळणवळण सुरळीत होऊन विकास व्हावा यासाठी गणपती घाट कटिंग व रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी २०१३ मध्ये शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; मात्र लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या घाट रस्त्याच्या गटारी तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे बोलले जात आहे, तर काही ठिकाणी गटारींचा अभावच दिसून येतो. त्यामुळे पावसाचे पाणी साचून संपूर्ण रस्ताच पाण्याखाली येऊन दलदल निर्माण होऊन रस्ता अक्षरश: फुटला आहे. खडी वाहून गेल्यामुळे दलदल तयार होऊन वाहने अडकून पडत आहेत. रस्त्याच्या या दुर्द्शामुळे या रस्त्यावरील वाहतूक वारंवार खंडित होऊन या भागाचा संपर्क तुटत आहे. (वार्ताहर)
गणपती घाटातील रस्ता खचला
By admin | Updated: July 24, 2016 22:56 IST