शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारेबरोबरच रस्ते निधीही अडचणीत

By admin | Updated: October 1, 2016 00:42 IST

वेळकाढू धोरण भोवणार : पदाधिकारी-प्रशासन वाद

नाशिक : जिल्हा परिषदेच्या २७०२ लेखाशीर्षाखाली जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेल्या २६ कोटी रुपयांच्या नियतव्ययावरून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्यात जुंपलेली असतानाच आता अशाच प्रकारे नियोजनाला विलंब झालेला रस्ते देखभाल व दुरुस्तीचा निधीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.गुरुवारी (दि. २९) या संदर्भात जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या शिष्टमंडळाने सुरुवातीला विभागीय आयुक्त एकनाथ डवले व नंतर सायंकाळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला २७०२ लेखाशीर्षाखालील आदिवासी उपयोजनेचा २६ कोटींचा निधी परस्पर जलयुक्त शिवार अभियानासाठी वर्ग करण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून एकूणच प्रशासकीय मान्यतेसाठी अन्य बाबींच्या माहितीची विचारणा केली होती. हा निधी परस्पर वळविण्याच्या कारणावरूनच २७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. याच सभेत केवळ लघुपाटबंधारे विभागाचाच निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वळविण्याचा निर्णय झालेला नाही, तर रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आलेला निधीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे व बांधकाम विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी आणि नियतव्यय मंजूर होऊनही त्याचे वेळेत नियोजन न झाल्यानेच हा निधी वरिष्ठ पातळीवरून अन्य विभागांकडे वळविण्याच्या हालचालींना सुरुवात झाली होती. त्याचाच एक भाग म्हणून २७०२ लेखाशीर्षाचा मंजुर नियतव्यय जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी वळविण्याचा निर्णय घेत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेला पाठविले होते. या पत्रावरूनच सर्वसाधारण सभेत गदारोळ उडून सभा स्थगित करण्यात आली होती. आता या निधीवरून जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.(प्रतिनिधी)माहिती मागविलीजिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाला जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी पाठविलेली पत्रे, आदिवासी उपयोजनेबाबतचा शासन निर्णय यासह बारीक माहितीचा तपशील जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी तातडीने मागविल्याचे समजते. या माहितीच्या आधारेच कदाचित जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.