शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था

By admin | Updated: August 13, 2014 00:46 IST

अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था

 

कळवण : कळवण - अभोणा -कनाशी- हतगड या राज्यमार्ग १७ रस्त्यावर जिरवाडा शिवारात सुरू असलेल्या पुलाच्या भराव कामावर मुरूम वाहणाऱ्या अवजड वाहनांमुळे जिरवाडा ते शिवभांडणे रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. आदिवासी बांधवांसाठी जीवघेणा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. कळवण तालुक्यातील कनाशी-हातगड रस्त्यावर तीन ठिकाणी पुलांचे काम सुरू आहे. या पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ््यापूर्वी करून घेणे गरजेचे होते. परंतु ठेकेदाराच्या आडमुठे धोरणापुढे सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाल्यामुळे काम पूर्ण न केल्याने आज महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचा तसेच कळवण व सुरगाणा या तालुक्याच्या आणि जवळपास १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. आजही या भागात पावसाचा जोर कायम असून, या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. जिरवाडे शिवारातील पुलावर मुरूम मातीचा भराव करण्याचे काम सुरू आहे. हा भराव जिरवाडे शिवारातील शिवभांडणे रस्त्यावरून खासगी मालकाकडून आणला जात आहे. मात्र मुरुम आणण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्याऐवजी ट्रकचा वापर केल्याने जिरवाडे -शिवभांडणे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे खचला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. हा रस्ता एक वर्षापूर्वी आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा निधीतून तयार करण्यात आला होता. जिरवाडे शिवारातील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक शिवभांडणे रस्त्याने सुरू होती, मात्र अवजड वाहनांनी रस्ता खराब केल्याने पर्यायी रस्ताही बंद झाला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समितीपर्यंत आणता येत नाही . आदिवासी विद्यार्थ्यांना वाहने बंद झाल्याने पायपीट करण्याची वेळ आली आहे. रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावी अन्यथा कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांसह टाळे ठोकू, असा इशारा कळवण पंचायत समितीचे सभापती मधुकर जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)